मराठा क्रांती मोर्चा व सर्व समाज बांधवांचे झाले सहकार्य
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी – एक हात मदतीचा माणुसकी जपण्याचा या उक्तीप्रमाणे पूरग्रस्तांसाठी फलटण तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत गोळा करून ती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्याकडे सुपूर्द करीत ती मदत सोलापूर व मराठवाड्यातील पाठविण्यात आली.
आज मंगळवार दिनांक ३०/०९/२०२५ रोजी मराठवाडा पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा फलटण यांच्या आवाहनाला साथ देत मराठा व सर्व जाती समाजातील बांधवांकडून मदत म्हणून धान्य, किराणा किट,कांदे बटाटे, भाज्या,नवीन साड्या व लहान मुलांची कपडे, शैक्षणिक साहित्य, मेडिकल साहित्य (गोळ्या,कप सिरप, सॅनिटरी पॅड),पाणी बॉटल, ब्लॅंकेट,चादरा,भांडी अशा मूलभूत अत्यावश्यक साहित्य पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत छ.शिवाजी महाराज यांना अभिवादन करून तसेच फलटण तालुका तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव यांच्या हस्ते गाड्यांचे पुजन करून तालुका परांडा जिल्हा धाराशिव व तालुका घनसावंगी जिल्हा जालना या पूरग्रस्त तालुक्यांमध्ये मूलभूत सर्व साहित्याचे दोन ट्रक रवाना झाले याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चा, फलटण चे मराठासेवक माऊली दादा सावंत,विक्रमसिंह शितोळे, किरण भोसले, नरेश सस्ते,रामभाऊ सपकाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

