जी.एस.टी.ऑफिस सातारा येथील दोघा राज्यकर निरीक्षक विरोधात लाच मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

सातारा:- जीएसटी टॅक्स मधील दंड व दंडावरील व्याज माफ करून देण्यासाठी तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच मागणी केल्या प्रकरणी रोहन सतीश देवकर व अक्षय मोहन फडतरे (वर्ग-२) राज्यकर निरीक्षक, वस्तू व सेवा भवन, सातारा या दोघांच्या विरोधात सातारा लाच लुचपत विभागाने केली कारवाई आहे.

पोलीस उप-अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन सतीश देवकर, राज्यकर निरीक्षक, वस्तू व सेवा भवन, सातारा. (वर्ग-२) (रा. मागील विहरी जवळ, मु.पो. देगाव, ता. वाई, जि. सातारा.) व अक्षय मोहन फडतरे, राज्यकर निरीक्षक, वस्तू व सेवा भवन, सातारा. (वर्ग-२) (रा. मु.पो. देगाव, ता.सातारा, जि. सातारा.) यांनी सदर प्रकरणातील तक्रारदार यांना सन सन २०२२- २०२३ मधोल जीएसटी टॅक्स मधील टूबी थ्री बी मधील फरक पडल्याने त्याचे दंड व दंडावरील व्याज माफ करून देण्यासाठी जी.एस.टी. ऑफिस सातारा येथील रोहन सतीश देवकर व अक्षय मोहन फडतरे राज्यकर निरीक्षक हे २५ हजार रुपये लाच मागणी करीत असल्याबाबत तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी दिनांक १९/०९/२०२५ लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालय सातारा विभाग येथे दिला होता.

तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक १९/०९/२०२५ रोजी लाच मागणी बाबत पडताळणी केली असता पडताळणी मध्ये जीएसटी कार्यालय सातारा येथील लोकसेवक रोहन देवकर राज्यकर निरीक्षक यांनी तक्रारदार यांचा सन २०२१-२०२२ व २०२२-२०२३ मधील बाकी भरण्याचा राहीलेला जीएसटी व त्यावरील दंड व दंडावरील व्याज माफ करून देण्यासाठी पंचासमक्ष ३० हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २० हजार रुपये लाचेची मागणी केली तसेच त्यांचे लाच मागणीस लोकसेवक फडतरे यांनी अपप्रेरणा दिली असल्याचे निष्पन्न झाल्याने रोहन सतीश देवकर व अक्षय मोहन फडतरे यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, शिरीष सरदेशपांडे ला.प्र.वि पुणे परिक्षेत्र,अपर पोलीस अधीक्षक, अर्जुन भोसले, ला.प्र.वि पुणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली परिवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक, राजेश वसंत वाघमारे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा,तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक, सुनिल पाटील, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा,पोलीस निरीक्षक, सुप्रिया गावडे, पो. हवा निलेश राजपुरे, पो हवा.गणेश ताटे, पो हवा निलेश चव्हाण, पो.कॉ. अजयराज देशमुख या सापळा पथकाने केली.

भ्रष्टाचारा संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लांकमेवकांबद्दल तक्रार असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, सि.स.नं. ५२४/अ, जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ, सदरबझार, सातारा यांचे खालील संकेतस्थळ / क्रमाकावर संपर्क साधावा. संपर्क: मोबाईल नं. www.achmaharashtra.net वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in फेसबुक पेज www.facebook.com-maharashtraACB कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२१६२/२३८१३९ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४, राजेश वसंत वाघमारे,पोलीस उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा मो.नं.९५९४५३११००,९७६३४०६५०० यांनी केले आहे.

error: Content is protected !!