श्री सदगुरू हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेत पर्यावरण पूरक आकाश कंदील बनविण्याचा उपक्रम

फलटण प्रतिनिधी:- फलटण येथील श्री सदगुरू हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेत पर्यावरण पूरक आकाश कंदील बनविण्याचा उपक्रम राबविण्यात आला.या वेळी विध्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने शेकडो आकाश कंदील तयार केले.

दीपावली काहीं दिवसांवर आली असल्याने आकाश कंदील व इतर साहित्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहे.दिवाळी सनानिमित्त घराघरात साफसफाई व सजावट केली जाते. त्यात मुख्य असतो तो म्हणजे आकाश कंदील.हा आकाश कंदील कसा करावयाचा याचा प्रत्यक्ष अनुभव सदगुरू शिक्षण संस्थेच्या विध्यार्थ्यांनी घेतला.

शिवम प्रतिष्ठान घारेवाडी शाखा फलटण च्या वतीने सुहास प्रभावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश कंदील बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी आकाश कंदील बनविण्याचे कृतियुक्त प्रशिक्षण मुलांना देण्यात आले.प्रत्येक विध्यार्थी आपला आकाश कंदील कसा चांगला होईल याकडे लक्ष देऊन प्रयत्न करीत होते.

कार्यानुभव विषयांतर्गत कागदकाम करताना कशापद्धतीने कागद काढावेत, योग्य पद्धतीने कागद कसा चिकटवायचा याचा प्रत्यक्ष अनुभव घेत असताना विध्यार्त्यांनच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.विद्यालयाच्या मल्टीपर्पज हॉल मध्ये कृतियुक्त प्रशिक्षण देण्यात आले.सहकार महर्षी हणमंतराव हायस्कुल चे प्राचार्य नागेश पाठक यांनी स्वागत केले. आनंदवन प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक प्रदिप चव्हाण यांनी आभार मानले. या प्रसंगी शिवम प्रतिष्ठान चे साधक, शिक्षक उपस्थित होते.

error: Content is protected !!