फलटण प्रतिनिधी:- भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यासाठी प्रा.श्रेयस कांबळे यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर या महामातांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनी केले. प्रमुख वक्ते प्रा.श्रेयस कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मंडळाने आयोजित केलेल्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
योग्य व्यक्तीकडेच योग्य मार्गदर्शन मिळते त्यामुळे चांगल्या लोकांशी संपर्क साधा असे सांगितले. मंडळ राबवत असलेले उपक्रम खुपच प्रेरणादायी आहेत असे म्हणत सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले. यावेळी प्रमुख उपस्थिती असलेले सामाजिक कार्यकर्ते हनुमंत केंगार आणि नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेचे आटपाडी तालुका अध्यक्ष अमित आयवळे यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पुढल्या वर्षी शैक्षणिक वस्तूंचे वाटप आणखी जोमाने करु असे सांगितले.
निरगुडी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य धनंजय लकडे यांनी मंडळाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप मोहिते, ढवळ गावचे उपसरपंच गणेश गोरे, बापूराव केंगार, सुनील जाधव, ॲड.भोसले, ॲड.बनसोडे होते. आभार मंडळाचे अध्यक्ष सुरज गोरे यांनी मानले. यावेळी माजी अध्यक्ष तानाजी गोरे,निलकुमार गोरे, भिकाजी गोरे, सुनिल गोरे, अनिल गोरे,लहू गोरे,प्रविण गोरे, रघुनाथ गोरे,सागर गोरे,अमित आवटे, आदेश गोरे, देवराज गोरे, आदित्य गोरे,साईराज गोरे, शंभूराज गोरे , समीर गोरे, विद्यार्थी आणि महिला वर्ग उपस्थित होते.

