महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार दि.२६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.४५ वाजता फलटण दौऱ्यावर येत आहेत. यावेळी विविध विकास कामांची उद्घाटने व भूमिपूजन कार्यक्रम नियोजित आहेत. यावेळी फलटण नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका संदर्भात आढावा सभा घेणार आहे.

यावेळी निरा- देवघर प्रकल्पातून उतरवली – खंडाळा धोम बलकवडी कालवा जोड प्रकल्पांतर्गत बंद पाईपलाईनद्वारे योजनेचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा, तसेच त्यापुढील टप्प्याचे भूमिपूजन करणार आहेत. नाईकबोमवाडी एमआयडीसीच्या माध्यमातून हजारों तरुणांच्या भविष्याचे दालन खुले करणार आहेत. विविध कंपन्यांचे प्रमुख उद्योगपतींच्या उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण पाहणी व आढावा बैठक होणार आहे.
याशिवाय दहिवडी – फलटण रस्त्याचे भूमिपूजन,फलटण नगरपालिका क्षेत्रातील रस्ते उद्घाटने, नूतन पोलीस स्टेशन कार्यालयांची उद्घाटने ,१०० कोटीची प्रशासकीय इमारत व अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन,बारामती प्रमाणे फलटणमधून वाहणाऱ्या निरा उजव्या कालव्याचे सुशोभिकरण प्रकल्प,फलटणमधील ८५ कोटीच्या काँक्रीट रिंग रोडचे काम,सेशन कोर्ट,महसूल भवन इत्यादी अनेक कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

फलटणचा भविष्यकाळ व विकास कसा असेल, हे प्रत्यक्ष अनुभवायचे असेल तर, ते मुख्यमंत्री महोदयांच्या या कार्यक्रमातून समजणार आहे.यासाठी फलटण तालुक्यातील तमाम नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहान माढा मतदार संघाचे माजी खासदार .रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

