आम्हाला कोणाचाही बदला घ्यायचा नाही, तर बदल घडवायचा आहे. : रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण :- मला माझ्या फलटणमधील जनतेने मोठे केले आहे. रणजितसिंह निंबाळकर कधीही मस्तीत वागला नाही. अधिकाऱ्यांना कधीही ब्र शब्द काढलेला नाही.आमच्याकडील काही लोक स्वतःला शहेनशाह समजतात. आमच्याकडची त्यांची जहॉगिरी गेली; पण त्यांची फुगिरी अजून गेलेली नाही. पुढून येणारे साप आहे की कुत्रं आहे, तो चावायला आला आहे की चाटायला हे आता आमच्या लक्षात येतंय. पण आम्ही कधीही ‘ब्र’ शब्द काढत नाही, पण मी ठरवलंय, साहेब आम्हाला कोणाचाही बदला घ्यायचा नाही, तर बदल घडवायचा आहे असे फलटण येथील कृतज्ञता मेळाव्यात रणजितसिंह ना निंबाळकर यांनी आपले मत व्यक्त केले.           

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई ,बांधकाम मंत्री छ शिवेंद्रराजे भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमार शिंदे आमदार सचिन पाटील , महेश शिंदे ,राहुल कुल , मनोजदादा घोरपडे ,राम सातपुते राजन परिचारक ऍड जिजामाला ना निंबाळकर , समशेरसिंह ना निंबाळकर यांची उपस्थित होते.           

 पुढे बोलताना रणजितसिंह म्हणाले  लोकसभा निवडणुकीत फलटण शहरातून मला ७६ टक्के, तर विधानसभेला आमदार सचिन पाटील यांना ७४ टक्के मतदान आहे, त्यामुळे शहराची भावना लक्षात येते. विरोधकांना केवळ २२ ते २४ टक्के मतदान आहे.               

 विधानसभा निवडणूक जिंकली, त्यावेळी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं. आपले विरोधक रामराजे नाईक निंबाळकर असतील किंवा त्यांचे कुटुंबीय असतील. एकाही कार्यकर्त्याने त्यांच्या दारात फटाके वाजवायचे नाहीत, त्यांच्या विरेाधात घोषणा द्यायच्या नाहीत किंवा त्यांच्या दारात जाऊन गुलाल उधळायचा नाही, अशी आठवण माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितली.            

फलटण येथे कृतज्ञता सोहळा आणि विविध विकास कामांचे ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. त्या कार्यक्रमात बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मनातील भावना बोलून दाखवल्या. निंबाळकर म्हणाले, कितीही वाईट प्रसंग आला, कितीही आरोप झाले तरी आम्ही संस्कृती पाळण्याचे काम करतो. दोन दिवसांपूर्वी एका भगिनीचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण तिने हातावर लिहिले हेाते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फलटणला येणार आहेत, म्हटल्यावर गलिच्छ राजकारण झाले. पण माझ्या फलटणच्या जनतेला माहिती आहे की रणजितसिंह निंबाळकर कधी चुकणार नाही.           

वयाच्या सोळाव्या वर्षी घरातील एक रुपयाही न घेता घरातून बाहेर पडलो होतो. वयाच्या अठराव्या वर्षी दुधाचा प्रकल्प उभा केला. हजारो शेतकऱ्यांचे दुध संकलन केले, एकाही शेतकऱ्याचा रुपया बुडविला नाही. आता स्वराज कारखान्याच्या माध्यमातून काम करत आहे. फलटण तालुक्यात सर्वाधिक दर कारखाना सुरू झाल्यापासून देतोय, असेही निंबाळकर यांनी स्पष्ट केले.मला माहिती नाही, कुठला मतदारसंघ राखीव होईल, भविष्यात संधी मिळेल ना मिळेल. मी खासदार असताना अनेक कामे एकाच वेळी आणली, असं मला सांगण्यात आले. त्यावर इन्स्टॉलमेंटमध्ये काम करायाची आपल्याला सवय नाही, असे निंबाळकर यांनी सांगत ‘मी उद्या राहील की नाही माहित नाही. पण, जीवात जीव असेपर्यंत जनतेची सेवा करत राहीन’ असेही त्यांनी नमूद केले.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे कारण जातीपातीच्या लाटांमध्ये शोधत, आपल्या कार्यक्षमतेवर भर दिला.त्यांनी सांगितले की, फलटण तालुक्यासाठी त्यांनी सचिन पाटील यांना आमदार म्हणून दिले आणि स्वतःसाठी नव्हे तर तालुक्यासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, त्यांनी फलटणसाठी शेवटपर्यंत लढण्याचा “कातड्याचे जोडे” करण्याइतकं वचन दिलं.

error: Content is protected !!