महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण:- फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून नगरसेवक पदासाठी रुपाली सुरज जाधव यांनी अर्ज दाखल केला.
जालिंदर जाधव यांचा फलटण शहरात मोठा जनसंपर्क असून त्यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. रुपाली सुरज जाधव या जालिंदर जाधव यांच्या धाकट्या सुनबाई आहेत.आज दिनांक १७ रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय गटाकडून वेगवान राजकीय हालचाली होऊन रुपाली सुरज जाधव यांनी प्रभाग ४ मधून नगरसेविका पदाकरीता राजे गटामार्फत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

