उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची फलटण येथे आज जाहीर सभा

फलटण : फलटण नगर परिषदेच्या २०२५ निवडणूक अनुषंगाने सातारा जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची गजानन चौक फलटण येथे दुपारी २ वाजता जाहीर सभा संपन्न होणार आहे.

फलटणमध्ये ते प्रथमच येणार असून त्यांची तोफ धडाडणार आहे.फलटण नगरपरिषदेच्या शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर व प्रभागातील शिवसेना व मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते येत आहेत. मुख्यमंत्री असताना व सध्या उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी फलटणकरांना काय दिले व इथून पुढे ते काय देणार हे ह्या सभेतून स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!