बरड येथे आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावर मिनी बसची दुभाजकाला धडक एक जण ठार

फलटण : आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावर बरड येथे भरधाव वेगात चाललेल्या मिनी बसने दुभाजकाला धडक दिली या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या एका व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला असून मिनी बसमधील सहा जण जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरून व ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावर बरड ता फलटण येथे सकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास पंढरपूरकडे अस्थिविसर्जनासाठी निघालेल्या मुबंई येथील कोळीवाडा परिसरातील मिनी बस एम.एच.५.एफ.जे.९७०५ च्या चालकाचे नियंत्रण सुटून पालखी महामार्गावर काम सुरू असल्याने लावण्यात आलेल्या तात्पुरत्या सिमेंट ब्लॉक दुभाजकाला धडक दिली.

यावेळी सिमेंट ब्लॉक यामधून काही ग्रामस्थ रस्ता ओलांडत होती. या दुभाजकामध्ये मयत जालिंदर सस्ते व काही शाळकरी मुले उभी होती. आळंदीहून पंढरपूरकडे जाणाऱ्या लेन मधील या भरधाव मिनी बसच्या चालकाकडून नियंत्रण सुटले व दुभाजकात उभ्या असलेल्या जालिंदर सस्ते यांना धडक बसली यामध्ये जालिंदर लक्ष्मण सस्ते (वय ६० वर्षे, बरड, तालुका फलटण, जिल्हा सातारा) यांचा मृत्यू झाला असून मिनी बसमध्ये १७ लोक प्रवास करत होते. यापैकी सहा जण जखमी झाले असून यामध्ये चालक दीपक कुमार चालक (देवीदिन मलपूर,भदोन उत्तर प्रदेश) जखमी झाला आहे.

घटनेची फिर्याद युवराज नामदेव ताटे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जायपत्रे करत आहेत.

error: Content is protected !!