फलटण तालुका तलाठी संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर,अध्यक्ष पदी सचिन क्षीरसागर

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क – विक्रम विठ्ठल चोरमले

फलटण :- फलटण तालुका ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संघटनेची सन 2025 ते 30 ची नूतन कार्य करण्याची निवडणूक दिनांक 23 रोजी पार पडली. यावेळी फलटण तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटना यांची नूतन कार्यकारणी निवड करण्यात आली यावेळी अध्यक्ष पदी सचिन क्षीरसागर यांची निवड करण्यात आली.

आयोजित संघटनेची निवड कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य संघटना माजी उपाध्यक्ष सोडमिसे रावसाहेब , पुणे उपविभाग उपाध्यक्ष पवार प्रशांत , सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुहास अभंग, फलटण तालुका तलाठी संघटना माजी अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले तर संघटनेचे मार्गदर्शक शीलवंत चव्हाण यांनी सर्व कार्यक्रमाचे संयोजन केले.

तालुका अध्यक्ष व कार्यकारिणी निवडीसाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेणेत आली. निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात घेण्यात आली.सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात तिचे आनंदी वातावरणात निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला. सर्व नूतन कार्यकारणी सदस्याच्या निवडी नंतर सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

फलटण तालुका ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) कार्यकारणी खालील प्रमाणे

अध्यक्ष – सचिन नारायण क्षीरसागर

उपाध्यक्ष – दीपक शिवाजी नलगे

कार्याध्यक्ष – संतोष यशवंत पुंडेकर

सरचिटणीस – संदीप रामचंद्र कुंभार

सह सरचिटणीस – महेश गजानन कुंभार

खजिनदार – निलेश शिवाजी कणसे

हिशोब तपासणीस – विनोद चव्हाण

सल्लागार – कैलास जाधव

संघटक – अविनाश जाधव

महिला प्रतिनिधी- पूनम कारंडे, सुवर्णा लावंड

मंडलाधिकारी प्रतिनिधी -मनीषा सावळकर

मंडल प्रतिनिधी – वाल्मीक भताने, अंजली धर्माधिकारी, योगेश आदलिंगे

error: Content is protected !!