शहरातील विविध समस्यांबाबत नगराध्यक्ष समशेरसिंह ना .निंबाळकर यांनी घेतली आढावा बैठक

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण- फलटण नगर परिषद नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी पहिल्याच दिवशी शहरातील विविध समस्यांबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत शहरातील पार्किंग व्यवस्था, स्वच्छता तसेच इतर महत्त्वाच्या नागरी समस्यांबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी तातडीने सोडवण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी दिले.

दिनांक २९ रोजी फलटण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिनांक ३० रोजी पहिल्याच दिवशी शहरातील विविध समस्यांबाबत आढावा घेण्यासाठी मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या समवेत सर्व विभागांची बैठक घेतली.

या बैठकीत पार्किंग व्यवस्था, स्वच्छता तसेच इतर महत्त्वाच्या नागरी प्रश्नांवर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.फलटण शहरातील नागरिकांना नव्याने पदभार स्वीकारलेल्या नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून शहराच्या सर्वांगीण विकासाची अपेक्षा आहे. शहरातील स्वच्छता व्यवस्था सुधारणा, वाहतूक व पार्किंग समस्यांचे निराकरण, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, महिला व पुरुष शौचालय, रस्त्यावर पडलेला राडारोडा तसेच नागरी सुविधा अधिक सक्षम करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक व तत्पर प्रशासन राबवावे, अशी अपेक्षा शहरवासीयांमध्ये आहे.फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत ठाम व सकारात्मक भूमिका मांडली आहे. शहरातील मूलभूत सुविधा सक्षम करणे, स्वच्छता व्यवस्था सुधारणा, रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक व पार्किंग समस्या सोडवणे यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने विकासकामे राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!