महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण: – फलटण शहरात दिवसाढवळ्या शाळेत निघालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरणाचा प्रयत्न करण्याची घटना घडली असून या घटनेमुळे शहरातील पालकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर घटने प्रकरणी दोन जणांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात विनयभंग व अपहरण प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,दिनांक 27/12/2025 रोजी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास पवार गल्ली तालुका फलटण, जिल्हा सातारा येथील रोडवर एक अल्पवयीन मुलगी गजानन चौक फलटण येथे क्लास वरून मुधोजी हायस्कूल येथे शाळेत जात असताना पवार गल्ली येथील रोडवर तिच्या पाठीमागून एक चार चाकी सिल्वर रंगाच्या स्विफ्ट गाडीतून अल्पवयीन मुलीच्या गल्लीतील मुलगा व ड्रायव्हर यांनी गाडी अल्पवयीन मुलीच्या जवळ गाडी थांबवली व गाडीतील मुलाने गाडीचा दरवाजा उघडून मुलगी हिचा हात धरून “चल गाडीत बस” असे म्हटल्याने ती मुलगी घाबरून जोरात ओरडून लागल्याने रस्त्यावरच एक माणूस तिचा जवळ आल्याने गाडीतील दोघेजण गाडी घेऊन तिथून पळून गेले.
फलटण शहरात दिवसा घडलेल्या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सदर प्रकरणी दोन जणांच्या विरोधात अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात विनयभंग व अपहरण प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आली नसून सदर गुन्ह्याचा तपास शहर पोलीस कर्मचारी करत आहेत.

