नगराध्यक्ष समशेरसिंह यांच्या आदेशानंतर शहरातील कचरा व राडारोडा उचलण्याची मोहीम सुरू

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण – नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी शहरातील विविध भागातील कचरा व राडारोडा तत्काळ उचलून स्वच्छता करण्याच्या सूचना नगर परिषद आरोग्य विभागाला दिल्या असून त्यांच्या सूचनेनंतर फलटण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील कचरा व राडारोडा उचलण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

शहरातील मुख्य रस्ते, चौक, वसाहती तसेच सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा व बांधकामाचा राडारोडा हटवण्यासाठी आरोग्य विभाग कर्मचारी व वाहने तैनात करण्यात आली आहेत. कोणत्याही परिस्थितीत शहरात साचलेला कचरा जाळू नये कचरा जाळण्याने प्रदूषण होत असून कचरा जाळण्याने धूर व काजळी याचा नागरिकांना त्रास होत आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कचरा जाळू नये तो उचलून घेऊन जाण्याच्या सूचना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच वाहतुकीत अडथळा ठरणाऱ्या बांधकामाचा राडारोडा हटवण्याचे आदेश बांधकाम विभाग व आरोग्य विभागात दिले आहेत.

कोणत्याही ठेकेदाराकडून अथवा बांधकाम कंत्राटदार यांनी वाहतुकीस वाहतुकीस अडथळा ठरतील असा बांधकामाचा राडारोडा रस्त्यावर टाकू नये, नगरपरिषदेच्या ठेकेदाराकडून राडारोडा उचलला न गेल्यास त्या त्या ठेकेदाराच्या निविदेमधून राडारोडा उचलण्याचा खर्च टाकण्याचे व त्याची वसुली करण्याचे आदेश बांधकाम विभागाला नगराध्यक्ष यांनी दिले आहेत.

फलटण शहरात कचरा संकलन करण्यासाठी ज्या घंटागाडी आहेत त्याची तात्पुरती दुरुस्ती करून घ्यावी रस्त्यावर घंटागाडीतून कचरा सांडणार नाही याची दक्षता कर्मचाऱ्यांनी घ्यावी.आरोग्य विभागाच्या या मोहिमेमुळे स्वच्छता सुधारण्यास मदत होणार असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

नागरिकांनी कचरा रस्त्यावर न टाकता कचरापेटीतच टाकावा तसेच राडारोडा अधिकृत ठिकाणीच टाकण्याचे आवाहन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!