महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण – हॉकी इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने राजकोट(गुजरात) येथे हॉकी इंडिया अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सब ज्युनियर स्पर्धांसाठी हॉकी महाराष्ट्र संघटनेच्यावतीने स्पर्धापूर्व निवड चाचणीचे आयोजित करण्यात आले होते.
या स्पर्धेपूर्व निवडचाचणी साठी दि हॉकी सातारा संघटनेच्या नऊ महिला खेळाडू निकिता वेताळ, श्रेया चव्हाण, अनुष्का केंजळे, तेजस्विनी कर्वे,अनुष्का चव्हाण, यादव, घाडगे,सिद्धी केंजळे, आरोही पाटील यांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्राच्या महिलांसंघाची अंतिम निवड करण्यात आली. त्यामध्ये दी हॉकी साताराच्या तीन महिला खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करत आपले स्थान मिळवले.त्यामध्ये निकिता वेताळ, श्रेया चव्हाण, अनुष्का केंजळे यांनी सलग तीन वर्ष महाराष्ट्राच्या संघामध्ये स्थान मिळून सातारा जिल्ह्याला बहुमान मिळवून दिला. या सर्व महिला हॉकी खेळाडू मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत.
सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये आणखी एक मानचा तुरा रोवला गेला आहे.या सर्व खेळाडूंना दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव तथा महाराष्ट्राच्या संघाचे ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे सर व एन आय एस हॉकी प्रशिक्षक सचिन धुमाळ सर प्रशिक्षण देत आहेत. तसेच प्रशिक्षणामध्ये सहाय्यक म्हणून बी.बी खुरंगे, सहाय्य करत आहेत.ही सर्व निवड प्रक्रिया हॉकी महाराष्ट्राचे अध्यक्ष कृष्ण प्रकाश सर (आयपीएस), वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे, उपाध्यक्ष ओलंपियन धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनात खाली घेण्यात आली. त्यांनी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.तसेच त्यांनी मार्गदर्शन करताना प्रशिक्षक व खेळाडूंना सांगितले की सातारा जिल्ह्यामध्ये फलटण सारख्या ठिकाणी जर एवढे चांगले खेळाडू तयार होत असतील तर तेथे “एस्ट्रोटर्फ” मैदान होणे अत्यंत गरजेचे आहे.
सर्व प्रशिक्षक व खेळाडूंचे विधान परिषदेचे मा.सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर ,महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समिती चेअरमन शिवाजीराव घोरपडे, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य वसंतराव शेडगे व दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष बाहुबली शहा, व इतर पदाधिकारी पंकज पवार, प्रवीण गाडे, विजय मोहिते,महेंद्र जाधव , सचिन लाळगे व माजी राष्ट्रीय खेळाडू सुजीत निंबाळकर यांनी अभिनंदन केले.

