आयडियल इंटरनॅशनल स्कूलचा अविस्मरणीय वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दिमाखात साजरा

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण – आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज फलटणचा वार्षिक स्नेहसंमेलन “Incredible India 2025-26” शनिवारी, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सजाई गार्डन येथे उत्साहात पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नितीन वाघमोडे (आयकर आयुक्त, पुणे), उद्योजक सतीश जगदाळे व होम मिनिस्टर फेम नितीन गवळी, स्कूल कमिटी मेंबर अजय जाधव आणि समीर तांबोळी,सागर बरकडे, लखन बरकडे, योगगुरु विद्या शिंदे,श्रद्धा शहा आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.सौ. वैशाली शिंदे, शाळेचे डायरेक्टर शिवराज भोईटे सर, सेक्रेटरी निखिल कुदळे,सेंटर हेड सुचिता जाधव, उपमुख्याध्यापिका सोफिया तांबोळी, प्रवीण पवार यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन गवळी यांनी रंगतदार व प्रभावी शैलीत केले. इयत्ता नववीचे क्रीडा कॅप्टन फैज मनेर यांनी स्वागतपर भाषण केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांचा सत्कार शिवराज भोईटे व निखिल कुदळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा पार पाडण्यात आला.

🏆 पुरस्कार वितरण सोहळा : गौरवाचा क्षण

Student of the Year (2025-26)पीजी – अरिहा चेतन गुंदेचा नर्सरी – त्रिशा सागर पवार, सरीषा सफल दोशी ज्युनियर केजी – अयांश अमित देवले, ईरा सोमनाथ नेरकर सिनियर केजी – रणवीर प्रविण फडतरे, ज्ञानेश अमित अडसूळ इयत्ता १ – अनुश्री कुंवर राजेंद्रसिंह राजपूत इयत्ता २ – रजनंदिनी पृथ्वीराज मोरे इयत्ता ३ – कृतिका महेश शेंडे इयत्ता ४ – अनुश्री अमोल शिंदे इयत्ता ५ – आराध्या विकास सस्ते इयत्ता ६ – शांभवी सागर चव्हाण इयत्ता ७ – निलया प्रवीण ननावरे इयत्ता ८ – जैद मतीन तांबोळी इयत्ता ९ – फैज वसीम मनेर इयत्ता १० – यश उदय पोळ पुरस्कार वितरण – कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. नितीन वाघमोडे यांच्याहस्ते करण्यात आले.

⚽ 🏆क्रीडा विभाग पुरस्कार विजेता

हाऊस – यलो हाऊसउपविजेता हाऊस – ग्रीन हाऊसयांचा सत्कार – उद्योजक सतीश जगदाळे सर यांच्या हस्ते करण्यात आला. Best Athletics Award• वेदांत देवकर (इ.५)• श्रेया गोळे (इ.५)• तन्मय देवकर (इ.७)• संस्कृती भोसले (इ.६)यांचा सत्कार – शाळेचे डायरेक्टर शिवराज भोईटे सर यांच्या हस्ते करण्यात आला.

🏆१००% उपस्थिती पुरस्कार( शिक्षक)

• अमृता राजेंद्र गायकवाड (2025-26)• श्वेता उमेश जाधव (2024-25) कोरिओग्राफर सन्मान –प्रशांत भोसले सर व तेजस फाळके सर यांचा सत्कार – स्कूल कमिटी मेंबर अजय जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आले. या गौरवशाली संधीचा लाभ घेत आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, फलटण परिवाराने मुख्य पाहुणे डॉ. नितीन वाघमोडे यांना मानपत्र प्रदान करून त्यांचा विशेष सन्मान केला. लोकसेवा, जलसंधारण, ग्रामीण विकास आणि विद्यार्थ्यांना नागरी सेवेकडे प्रेरित करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य व नेतृत्व आदर्शवत आहे.

सातारा जिल्ह्यातील ‘टॅंक मायग्रेशन’ सारख्या उपक्रमांमुळे अनेक गावांना पाणी मिळाले व जीवनमानात सकारात्मक बदल घडला. प्रशासकीय भूमिकेसोबत सामाजिक उत्तरदायित्व जपणाऱ्या अशा व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करणे ही शाळेसाठी अभिमानाची बाब ठरली.विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरणाऱ्या या मान्यवरांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक सत्कार करत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

सांस्कृतिक कार्यक्रम — रंगत, अभिव्यक्ती आणि तांडवाचा सुरेल मिलाफ कार्यक्रमाची सुरुवात भव्य ‘शिवतांडव’ नृत्याने झाली. शक्ती, तांडव आणि नादब्रह्माचा अद्भुत संगम पाहून संपूर्ण प्रेक्षागृह रोमांचित झाले. ‘डम डम डमरू बाजे’ आणि ‘बम बम भोले’ या भक्तिरसपूर्ण गीतांवर लहानग्यांनी गोंडस नृत्य सादर करत उपस्थितांचे मन जिंकले. नर्सरी व प्लेग्रुप विद्यार्थ्यांनी ‘बूम बूम इंग्लिश’, ‘जिंगल बेल’ यावर केलेले बालनृत्य हा निरागसतेचा आनंद देणारा क्षण होता. ‘करंट लागा रे’, ‘नवराई माझी लाडाची’, ‘ओम शांती ओम’, ‘विठ्ठल विठ्ठल’, ‘मिक्स डिस्को’ या गीतांनी सभागृहात उत्साह व रंगत वाढवली.पाचवी ते नववीतील मुलींनी सादर केलेले क्लासिकल नृत्य मन मोहवणारे ठरले.

वेशभूषा, भाव आणि सुंदर अंगविक्षेपांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. सातवीच्या मुलींनी पेश केलेले ओडिसी-संबळपुरी नृत्य हा ताल-लय व लोकसंस्कृतीचा अप्रतिम संगम ठरला. ‘मेरा वाला डान्स’, ‘गोलमाल अगेन’, ‘मुक़ाबला’, ‘डान्स का भूत चढिया’, ‘मराठी रेट्रो’, ‘शानदार’, ‘यमला पगला दिवाना’, ‘देशी गर्ल’, ‘हिंदी रेट्रो’ व अन्य अनेक नृत्यांमुळे रंगतदार वातावरण सतत उत्साही राहिले.मुलांच्या हसवणूक करणाऱ्या सादरीकरणाने ‘फनी डान्स’ ने हास्याची खळखळ निर्माण केली, तर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या विनोदी सादरीकरणाने टाळ्यांचा वर्षाव झाला.

‘इन्स्पिरेशन सॉंग’ मध्ये आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रबळ इच्छाशक्ती आणि चिकाटी असेल तर शारीरिक अडचणींवरही यश मिळवता येते, हा मनाला भिडणारा प्रेरणादायी संदेश पोहोचवला. त्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘स्कूल लाइफ थीम’ने शाळा, शिक्षक आणि मित्रांविषयीची भावनिक नाळ रंगमंचावर जिवंत केली. बालपणीच्या आठवणी, स्नेह, दंगा, शिस्त आणि निरोपाचा स्पर्श सांगणारे हे सादरीकरण अनेक पालकांच्या नजरा पाणावून गेले.

‘वीर शिवा काशीद’ — इतिहासाचा अभिमान जागवणारा क्षणयानंतर सादर झालेले ‘वीर शिवा काशीद’ हा ऐतिहासिक नाट्यप्रयोग संपूर्ण कार्यक्रमाचे शिखर ठरले. शिवा काशीदच्या बलिदानाच्या निर्णायक क्षणाने सभागृह भावविभोर झाले. नाटकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे घोड्यावरून दिमाखदार आगमन होताच संपूर्ण वातावरण जय भवानी – जय शिवाजी च्या घोषात दुमदुमले. त्यानंतर सहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘आया रे आया तुफान’ या गीतावर नृत्य सादर करत शिवरायांना अभिवादन केले.

उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यशस्वी आयोजनाचा मोलाचा आधारया स्नेहसंमेलना मागील मुख्य प्रेरणा आणि आधारस्तंभ म्हणून मुख्याध्यापिका डॉ. सौ. वैशाली शिंदे यांचे नाव आदराने घ्यावे लागेल. मुलांच्या प्रत्येक क्षमतेला व्यासपीठ मिळावे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि कला-संस्कारांची ज्योत सतत पेटती राहावी, या हेतूने त्यांनी संपूर्ण तयारी मनापासून सांभाळली. कार्यक्रमात प्रत्येक सादरीकरणातून त्यांचे विद्यार्थ्यांवरील प्रेम, जिव्हाळा आणि मार्गदर्शक भूमिका स्पष्ट जाणवत होती.नृत्यदिग्दर्शनात प्रशांत भोसले आणि तेजस फाळके यांनी सातत्याने मेहनत घेऊन विद्यार्थ्यांच्या कलेला सौंदर्य दिले. त्यांच्या संयम, मार्गदर्शन आणि सरावातील जिव्हाळ्यामुळे रंगमंचावरची प्रत्येक सादरीकरणे अधिक दर्शनिय झाली. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा सोहळा केवळ यशस्वीच नव्हे, तर मनात कायम राहील असा एक सुंदर अनुभव बनला.

error: Content is protected !!