वाठार निंबाळकर सार्वजनिक रस्ता उकरून दहा लाखांचे नुकसान, गुन्हा दाखल

फलटण – फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर गावाच्या हद्दीतील सार्वजनिक रस्ता उकरून अज्ञात व्यक्तीने शासनाच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते दि. ३ रोजी दुपारी २.५६ वाजेपर्यंत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर दि. ३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत फिर्यादी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग,वशाखा अभियंता मनोज कुमार अनिल शिर्के यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वाठार निंबाळकर गावाच्या हद्दीतील तरटे वस्ती ग्रामीण मार्ग क्र. २६३ हा नुकताच डांबरीकरण करण्यात आलेला सार्वजनिक रस्ता अज्ञात इसमाने उकरून काढला. त्यामुळे शासनाचे अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाले असून नागरिकांच्या ये-जा व वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२६ तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी अज्ञात असून कोणतीही अटक झालेली नाही.या घटनेचा पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!