फलटण येथे आढळला अत्यंत दुर्मिळ असा अल्बिनो नाग जातीचा साप

फलटण प्रतिनिधी:- परिसरात अत्यंत दुर्मिळ असा अल्बिनो (रंगदोष असलेला) साप लोकवसाहतीमध्ये आढळून आला. यावेळी नेचर अँड वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटणचे प्रतिनिधी व वन्यजीव रक्षक यांनी घटनास्थळी पोहचून पाहिले असता तो भारतीय चष्मेवाला नाग (इंडियन स्पेकटॅकल्ड कोब्रा) जातीचा अल्बिनो साप असल्याचे समजले व त्याचा रंग पूर्ण गुलाबी-पांढरट असा दिसून आला.अधिवासात सोडण्यात आले.अल्बेिनिझम ही एक दुर्मिळ अनुवांशिक स्थिती आहे, जी उत्परिवर्तन किंवा बदलांमुळे उद्भवते, जी शरीरात तयार होणाऱ्या मेलेनिनच्या प्रमाणात प्रभावित करते. मेलेनिन सापांमधे त्वचा, डोळ्यांचे रंगद्रव्य (रंग) नियंत्रित करते. अल्बिनिझम असलेल्या सापांची त्वचा व डोळे अत्यंत फिकट गुलाबी पांढरट असते. हा एक असा अनुवांशिक विकार आहे, जिथे कोणत्याही सजीवाचा जन्म नेहमीपेक्षा कमी मेलेनिन रंगद्रव्यासह होतो.भारतात अनेक प्रकारचे साप आढळतात. काही साप अत्यंत विषारी असतात. सर्पदंशामुळे अनेक लोकांचा मृत्यूही होतो. अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. भारतात आढळणारे काही साप अत्यंत विषारी असतात. त्यापैकी सर्वात धोकादायक आणि अतिविषारी जात म्हणजे इंडियन कोब्रा किंवा स्पेक्टेकल्ड कोब्रा. त्याच्या फण्यावरील चष्म्याच्या आकाराच्या चिन्हावरून तो ओळखला जातो. देशाच्या काही भागात त्याची नाग म्हणून पूजा केली जाते.

error: Content is protected !!