फलटण : भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल फलटण शहर व तालुका भाजपतर्फे आज, बुधवारी दुपारी भाजप पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी फटाके वाजून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील,माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापुरुषाच्या पुतळ्यांना हार अर्पण करत फटाके वाजून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी, आमदार सचिन पाटील,भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे,जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले, मंडल अध्यक्ष अमोल सस्ते ,शहराध्यक्ष अनुप शहा, पुर्व मंडल अध्यक्ष बजरंग गावडे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव,नगरसेवक सचिन अहिवळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याचा आनंद भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जल्लोष करून आजच साजरा केला आहे. ५ डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील. याचा मनस्वी आनंद शहरातील व तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना होत आहे.