शिरवळ प्रतिनिधी :-“ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती” यांच्या माध्यमातून वाठार कॉलनी (भादे) येथे करण जगताप यांच्याकडे ऍग्रो नॉमिक्स एग्रीकल्चर ड्रोन सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

ड्रोन फवारणी मुळे शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारे आहे, तसेच पिकावरील औषध देखील कमी लागणार असून सर्वात महत्वाचे एक एकरसाठी फक्त १० लिटर पाण्याचा वापर होत आहे त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होत असून शेतकऱ्यांच्या वेळेमध्ये सुद्धा बचत होत आहे.एक एकर फवारणी फक्त सहा ते सात मिनिटात होते त्यामुळे वेळेची बचत मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.

तसेच थोड्याच दिवसात ऊस पिकातील उत्पन्न वाढीसाठी ए.आय सेंटर वाठार कॉलनी येथे लवकरच चालु करणार असल्याचे यावेळी ड्रोन विभाग प्रमुख शोएब शेख यांनी सांगितले.याचा लाभ खंडाळा तालुक्यातील आणि शेजारील तालुक्यातील शेतकरी बांधवांनी घ्यावा असे आवाहन के व्ही के, बारामतीचे ड्रोन विभाग प्रमुख शोएब शेख यांनी केले आहे.



