काळगाव परिसरातील करपेवाडी येथे रानडुकरे व गव्याकडून भात रोपांच्या तरव्याचे नुकसान

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- गव्यांचे लोंढेच्या लोंढे व रानडुक्करांचे कळप जंगलाबाहेर पडल्याने विभागातील डोंगर पट्ट्यासह इतर गावातील शेत कऱ्यांची झोपच उडाली असून काळगाव परिसरातील करपेवाडी येथील शेतकऱ्यांच्या भात पिकांच्या तरवाचे मोठ्या प्रमाणात गवे व डुक्करांनी तुडवून व खावून मोठे नुकसान नुकसान झाले आहे. वन विभागाने वन्यप्राण्याचा बंदोबस्त करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

याबाबतची माहिती अशी येथील संजय किसन मानुस्करे,लक्ष्मण बळी मानुस्करे, किसन मानु मानुस्करे, उत्तम आनंदा मानुस्करे,सयाजी वसंत सावंत यांच्या गावाशेजारील शिवारात भात लागणीसाठी टाकलेले तरवे गव्यांनी तुडवून खावून टाकून नुकसान केले आहे.त्यामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडला आहे. वाल्मीक खोऱ्यासह काळगाव परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असून पूर्वीपासूनच तेथे बिबट्या,गवे, रानडुक्करे आदी वन्य प्राण्यांचा उपद्रव कायम असल्याने शेती आणि तिच्यावरच उपजीविका असलेली कुटूंबे पूर्णतः अडचणीत सापडली आहेत.

पेरणीपासून पीक काढणीपर्यंत गव्यांचे व डुक्करांचे कळप पाठ सोडत नसल्याने शेतकरी मेटुकुटीला आला आहे. गव्यांचे लोंढेच्या लोंढे जंगलाबाहेर पडल्याने शेतकरी रडकुंडीला आले आहेत. गाव परिसरातील शिवारात रात्रंदिवस चरणारे त्यांचे कळप छातीत धडकी भरवत आहेत तरी वन विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देत वन्यप्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

खरीप हंगाम असो किंवा रब्बी या.हंगामात गवे,डुकरे, वानरांच्या कळप शेतात धुसून मोठे नुकसान करत असल्याने शेती करणे अवघड झाले आहे.अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे बंद करून मुंबईचा रस्ता धरला आहे.

वाल्मिक परिसरातील लोकांना गेली अनेक वर्षांपासून नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीने ग्रासले आहे.पावसाळ्यात जनजीवन विस्कळीत होतेच शिवाय डोंगराळ भाग असल्याने मोठ्या प्रमाणात भुस्खलन होते त्यामुळे आमचे कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे अशी मागणी येथील लोकांनी अनेक वेळी केली आहे.

वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव शेतीला मोठ्या प्रमाणात हाणीकारक ठरत असून शेतीमध्ये घातलेल्या बियाणांचे सुध्दा उत्पन्न मिळत नाही.त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे.वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे अनेकजणांनी गावं सोडून मुंबईचा रस्ता धरला.मात्र थोडीफार लोक येथे शेती करत आहेत. मात्र तीही वाया जात आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा. (संजय मानुस्करे, शेतकरी, करपेवाडी)

error: Content is protected !!