फलटण येथील गिरवी नाक्यावर तरुणाचा एअर पिस्तुलातून गोळीबार, एकास अटक तर एक जण फरार

फलटण प्रतिनिधी : फलटण गिरवी नाका येथे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विना नंबर प्लेट गाडीवर संशयास्पद फिरणाऱ्या दोन संशयितांना शहर पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता झालेल्या धरपकडीत त्यांनी एअर पिस्तुलातून हवेत गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती घटनास्थळावरून मिळत आहे.

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, सजाई गार्डन जाधववाडी कडून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विना नंबर प्लेट गाडीवर दोन जण संशयास्पद फिरत गिरवी नाका येथे आले असता शहर पोलिसांनी संशय आल्याने संशयास्पद फिरणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता दोन चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यातील एका चोरट्यांनी त्याच्या ताब्यातील एअर पिस्तुलाचा धाक दाखवत हवेत गोळ्या झाडल्या.

शहर पोलिसांनी अत्यंत शिताफीने आणि धाडसाने एका संशयितांना ताब्यात घेतले तर यावेळी एकजण फरार झाला.यावेळी गोळीबारात वापरण्यात आलेले पिस्तूल हे एअर पिस्तूल असल्याची माहिती मिळत आहे. या थरारक घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी या परिसरात मोठी गर्दी असते.

शहर पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नसून अटक करण्यात आलेल्या एका आरोपीकडून अधिक तपास सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.रात्री उशिरापर्यंत फलटणमध्ये या घटनेची चर्चा चांगलीच रंगली होती. गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या घटनेमुळे फलटण शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

error: Content is protected !!