श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भामध्ये भाजपा प्रदेश अध्यक्ष व प्रभारी अध्यक्ष यांना अहवाल सादर

बारामती प्रतिनिधी:- भाजपा प्रदेश अध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे व प्रभारी अध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांची भेट घेऊन नुकत्याच झालेल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भामध्ये सविस्तर अहवाल सादर केला. निवडणुकी मधे पॅनेलला मिळालेली मते महत्वपूर्ण असून अशा कठीण परिस्थितीमध्ये पॅनेल उभा करण्याचा धाडस केल्याबद्धल दोन्ही नेत्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस पक्ष खंबीरपणे पाठीशी उभा राहील असे आश्वासन यावेळी दिले.

या पुढच्या काळात भाजपा लक्ष देऊन ग्रामीण भागाचा अर्थकणा असलेल्या साखर कारखान्यामध्ये लक्ष देऊन कार्यकर्त्याना ताकद देणार असल्याचा शब्द यावेळी दोन्ही नेत्यांनी दिला असल्याचे किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष तानाजीबापू थोरात यांनी सांगितले. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मा. गणेशतात्या भेगडे , प्रदेश उपाध्यक्ष दादापाटील सातव, प्रदेश सचिव मनोज कासवा, जयेंद्र चव्हाण उपस्थित होते.

error: Content is protected !!