शिरवळ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भादे तर्फे शाळेतील लहान मुलांचा बाल बाजाराचे श्री भैरवनाथ मंदिर भादे येथे आयोजन करण्यात आले होते.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी व शाळा कमिटीने या लहान मुलांचे बुद्धीकौशल्य आणि व्यवहारज्ञान प्रबळ करण्यासाठी एक आगळावेगळा कार्यक्रम पार पाडला.

याप्रसंगी या लहान मुलांनी मोठ्या उत्साहात या बाल बाजाराला उपस्थिती लावून भाजीपाला खाद्यपदार्थ यांची गावकऱ्यांना विक्री केली.बाल मेळाव्यात शालेय विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ, भाजीपाला विक्रीसाठी आणले होते. यातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान मिळवले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राऊत, शिक्षकवर्ग नेवसे, सोनावणे, नेवसे, दिवटे, धायगुडे, तसेच शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष गणेश गायकवाड, उपाध्यक्ष रुपाली साळुंखे,सदस्य सागर मुगुटराव साळुंखे, गणेश पवार,अर्जुन अण्णा जगताप,मालन ताई चव्हाण,प्राची जगताप,वाघ,रोहिणी महांगडे, पप्पू करुंचे,संतोष चिव्हे ग्रामस्थ, पालक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सर्वच मंडळींनी या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थिती दाखवून मुलांचे प्रोत्साहन वाढवण्याचे काम केले.