ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- महाराष्ट्राचे लाडके व कार्यक्षम मुख्यमंत्री मा. ना. श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त ढेबेवाडी (ता. पाटण) येथील आय. टी. आय. कॉलेज या ठीकाणी महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळ रक्त संकलनसाठी फलटण मेडिकल फौंडेशन -ब्लड सेंटर उपस्थित होते 137 रक्तदात्यांनी रक्तदान केले. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस देखील असाच सामाजिक उपक्रमातून रक्तदान करून साजरा केला जायचा तोच आदर्श पुढे ठेवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले. ना कोणती बॅनरबाजी करून ना कोणती जाहिरात करून समाजासाठी याचा काहीतरी फायदा होईल अशा स्वरूपात रक्तदान करून वाढदिवस साजरा करण्यात यावा असे प्रतिपादन भरत पाटील राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ संचालक यांनी केले.
तसेच हिंदुराव पाटील बापू म्हणाले. पाटण तालुक्यामध्ये सर्वत्र भाजपच असेल अशा प्रकारचे चित्र येणाऱ्या काळामध्ये दाखवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपण सर्वजण मिळून एकत्रित काम करण्याचे आवाहन हिंदूराव पाटील बापू यांनी केले. यावेळेस भरत पाटील राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ संचालक, विक्रम पावसकर प्रदेश उपाध्यक्ष, ढेबेवाडी विभागातील ज्येष्ठ नेते हिंदुराव पाटील बापू माजी कृषी सभापती, गणेश यादव पाटण दक्षिण मंडल अध्यक्ष, यज्ञसिंह पाटणकर कोयना शिक्षण संस्थेचे संचालक, दीपक महाडिक सातारा जिल्हा उपाध्यक्ष, नितीन पाटील युवा नेते,प्रताप देसाई माजी उपसभापती पं. स. पाटण, कविता कचरे महिला प्रदेश सचिव, नानासो सावंत भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते, आदित्य शेवाळे सोशल मीडिया अध्यक्ष पाटण दक्षिण, सचिन जाधव माजी सरपंच, अभिजीत कडव उपसरपंच ढेबेवाडी, सोमनाथ पाटील ग्रा. स.ढेबेवाडी, शेखर लोखंडे, अण्णा कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते.