ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- ढेबेवाडी व ढेबेवाडी परीसरात गेले अनेक महिने ढेबेवाडी परीसरात बी.एस.एन.एल ची रेंज ये – जा करत असल्या मुळे ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एकंदरीतच बी.एस.एन.एल ची कनेक्टिंग इंडिया ऐवजी डिस्कनेक्टिंग इंडिया अशी वाटचाल सुरू आहे.

ढेबेवाडी कराड अशी अँप्टीकल फायबर केबल गेले एक वर्ष खोदकाम करुन पुर्ण झाले आहे.अँप्टीकल मशीन ढेबेवाडी आँफीसला कराड ढेबेवाडी टेस्टींग होउन सुद्धा अँप्टीकल लाईन चालु होत नाही.त्यामुळे बी.एस.एन.एल टॉवर 4 जी मशीन बसवून सुद्धा नेटवर्क येत नाही. त्यामुळे बी.एस.एन.एल टॉवरची अवस्था असुन अडचन नसुन खोळंबा अशी झालेली आहे.ढेबेवाडी परीसरात आठ टॉवर आहेत व ढेबेवाडी परीसरातील अनेक शासकीय कार्यालय , पतसंस्था , शासकीय बँका यांना मासीक लीज कनेक्शन प्रती १६००० ते १७००० रुपये आहे. तसेच कृषी ग्राहक ५०० व ईतर ग्राहक २००० च्या आसपास आहेत.

सुरुवातीच्या काळापासुन हे ग्राहक बी.एस.एन.एल चा वापर करत आहेत .मात्र गेली अनेक महिन्यापासून नेटवर्क ये-जा होत असल्यामुळे ग्राहकांना शासकीय कामात नेटवर्कची वाट पहात दिवस घालवावा लागतोय.कृषी ग्राहकांना 141 रु रिचार्ज असल्याने शेतकरी वर्गातील लोक तो रिचार्ज मारतात पण नेटवर्क ये- जा करत असल्याने मारलेल्या रिचार्जची फुकटची खीशाला झळ बसत आहे.त्यामुळे बी.एस.एन.एल ग्राहक वर्गातुन नाराजी दिसत आहे.
बी.एस.एन.एल नेटवर्क नसल्यामुळे अनेक ग्राहक दुसऱ्या कंपन्यांना पसंदी दाखवत आहेत. वर्षानुवर्ष रस्त्याच्या बाजुने चर मारुन या केबल नवीन टाकल्या जातात.मात्र ग्राहकांना त्या स्वरुपात सेवा सुद्धा दिली जात नाही. त्यामुळे अनेक बी.एस.एन.एल ग्राहकांनी कंपनीकडे पाठ फिरवली आहे.अशीच जर अवस्था राहिल्यास उरलेले ग्राहक सुद्धा आपले कार्ड दुसऱ्या कंपनी मध्ये पोर्ट करण्याच्या मार्गावर आहेत.दुरसंचार विभागाने याची दखल घेऊन वेळेतच उपाय योजना कराव्या.
शेखर लोखंडे -भाजपा ओबीसी जिल्हा मोर्चा उपअध्यक्ष
