शिरवळ – पुणे बेंगलोर महामार्गावरील शिंदेवाडी (ता.खंडाळा) परिसरात खड्डा चुकविण्यासाठी वेग कमी केल्याने दुचाकीला ट्रकची मागून धडक बसून झालेल्या अपघातात युवती जागीच ठार झाली, तर युवक गंभीर जखमी झाला.
याप्रकरणी घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की रविवारी (दि.12) रोजी महामार्गावरील शिंदेवाडी परिसरात रस्त्यावर असलेला खड्डा चुकवताना दुचाकीचा क्रमांक (MH.01.DJ.8365) वेग अचानक कमी केला यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकची (PB.06.AU.9995) मागून दुचाकीला जोरदार धडक बसली. यावेळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवती रुबल सिन्हा (वय 26 रा.ओडिसा,सध्या रा.पुणे) गंभीर जखमी होऊन जागेच ठार झाली तर दुचाकी चालक शहाऊद शेख (वय 33 वर्षे रा.सय्यद मोहल्ला एरंडोल जळगाव ता.जि.जळगाव) हा गंभीर जखमी झाला आहे.अपघाताची माहिती कळताच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास यादव,पोलीस अंमलदार अरविंद बाहरहाळे, भाऊसाहेब दिघे, शिरवळ रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले.