फलटण प्रतिनिधी:- जुन्या झालेल्या भांडणाच्या रागातून तीन जणांना अडवून मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या फिर्यादीनुसार, फिर्यादी यश संतोष निंबाळकर ( रा कुरवली खुर्द ता फलटण जि सातारा) १२ वी मध्ये मुधोजी हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण येथे शिक्षण घेत आहे. फिर्यादी यश यांचे कॉलेजचे गेटवर मागील १५ दिवसापुर्वी व अनिकेत घाडगे यांचेत शिव्या देणेवरून भांडणे झाली होती.

दि.८ जुलै रोजी फिर्यादी यश व त्याचा मित्र सुरज जाधव, विष्णु जाधव असे सुरजचे मोटार सायकलवरून फलटण ते उपळवे डांबरी रोडने रात्री १०:१० वाजण्याच्या सुमारास जात असताना जाधववाडी (बिरदेवनगर) येथे १) अनिकेत घाडगे, २) साहील बुढा, ३) साईनाथ रायते, ४) प्रज्वल मोहीते, ५) अश्विन देशमाने, ६) समर्थ जाधव, सर्व रा. दत्तनगर, फलटण, ता. फलटण हे तीन मोटार सायकलवरून येवुन फिर्यादी व त्याचे मित्र यांना थांबवुन अनिकेत घाडगे व त्याच्या सोबत असणाऱ्या मुलांनी शिवीगाळ दमदाटी करणेस सुरुवात केली त्यावेळी त्यातील साहिल बुढाने लोखंडी गजाने फिर्यादी यश याच्या उजवे गालावर मारहाण केली व अनिकेत घाडगे याने फिर्यादी यश छातीवर दगड मारून, साईनाथ रायते, प्रज्वल मोहिते, अश्विन देशमाने, समर्थ जाधव यांनी हाताने बुक्याने मला मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली.

यावेळी सोबत असले सुरज जाधव, विष्णु जाधव यांनाही हाताने मारहाण केली.याप्रकरणी फिर्यादी यश याने १)अनिकेत घाडगे, २) साहील बुढा, ३) साईनाथ रायते, ४) प्रज्वल मोहीते, ५) अश्विन देशमाने, ६) समर्थ जाधव, सर्व रा. दत्तनगर, फलटण, ता. फलटण या सहा जणांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास फलटण शहर पोलीस करत आहेत.