तरडगाव येथे पीएसओ विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली सांत्वन भेट

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण–फलटण तालुक्यातील तरडगाव येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांचे सुरक्षा रक्षक (पीएसओ) स्वर्गीय विदीप जाधव यांच्या तरडगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी जाधव कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला.

शोकाकुल कुटुंबियांसोबत संवाद साधत सुनेत्रा पवार यांनी संवेदनशीलतेने त्यांच्या भावना ऐकून घेतल्या व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.दिवंगत जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत, “कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे,” असा धीर देत त्यांनी जाधव कुटुंबियास आधार दिला. या भावस्पर्शी भेटीने उपस्थितांचे डोळे पाणावले.

कर्तव्यपथावर असतानाही अत्यंत संयम व मायेने जाधव कुटुंबियांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला.विदीप जाधव यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर ओढावलेल्या दुःखात सहभागी होत उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आई, वडील, पत्नी, मुलं व नातेवाईकांशी संवाद साधला.यावेळी आ. सचिन पाटील, माजी आमदार दिपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, सुरेंद्र घाडगे व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!