दिलीपसिंह भोसले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

फलटण प्रतिनिधी:- श्री सदगुरू व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सत्कार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

शनिवार दि. 11 ऑक्टोंबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये महिला भजनी मंडळ, बाल भजनी मंडळ,पुरुष भजनी मंडळ सहभागी असणार आहेत. विजेत्या भजनी मंडळास 14 ऑक्टोंबर रोजी दुपारी 4 ते 6 यावेळे मध्ये बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या भजनी मंडळास रोख रक्कम स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

यावेळी श्री दिलीपसिंह भोसले यांचा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी वारकरी संघटनेचे विशेष सहकार्य लाभणार आहे. या स्पर्धा महाराजा मंगल कार्यालयात सकाळी 7.30 ते सायंकाळी 7 या वेळेत संपन्न होणार आहेत.14 ऑक्टोंबर रोजी महाराजा मंगल कार्यालयात सकाळी 9 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.

तसेच सायंकाळी 6.30 वाजता वडजल (ता.फलटण) येथे वृक्षारोपण व ग्रामस्थांसाठी वॉटर एटीएम मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 14 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जिजाई बंगला लक्ष्मीनगर फलटण येथे शुभेच्छा स्विकारण्यात येणार आहेत तसेच सदगुरू व महाराजा उद्योग समूहातील सभासदांना लाभांश वाटप व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस व बक्षीस वाटप करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास फलटणकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री सदगुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले व महाराजा मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडिट सोसायटीचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी केले आहे.

error: Content is protected !!