भटक्या कुत्र्यांना वाचवाल, तर संस्था व व्यक्तीवर कठोर कारवाई; सुप्रीम कोर्टाचा कडक इशारा

नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. भटक्या कुत्र्यांनी पादचाऱ्यांना चावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. नागरिकांना होणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. भटक्या कुत्र्यांना वाचवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

सुप्रीम कोर्टाने सोमवारी आठ आठवड्यात भटक्या कुत्र्यांना पकडून ‘डॉग शेल्टर’मध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहेत. भटक्या कुत्र्यांवर कारवाई करताना कोणती संस्था किंवा व्यक्तीने अडथळा घालणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, ‘भटक्या कुत्र्यांना चावा घेतल्याचा घटना वाढल्याने कोर्टाने कारवाईचे आदेश दिले आहेत.

न्यायाधीश जेबी पारदीवाला आणि न्यायाधीश आर महादेवन यांच्या पीठाने हे आदेश दिले आहेत. दिल्लीत साधारण ५०००० भटक्या कुत्र्यांना निवारा बनवण्याचे आदेश दिले आहेत’.भटक्या कुत्र्यांची नसबंधी करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ केली पाहिजे. भटक्या कुत्र्यांना विशेष निवाऱ्यामध्ये ठेवलं पाहिजे. भटक्या कुत्र्यांना रस्ते, गल्ली आणि कॉलनीत सोड नये, असेही कोर्टाने म्हटलं.

प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांवर कारवाई करताना अनेक संस्था व व्यक्ती निवेदने देऊन आंदोलने करण्याची धमकी देऊन प्रशासनावर कुत्र्यांवर कारवाई न करण्यासाठी दबाव टाकतात. आता भटक्या कुत्र्यांवर कारवाई करताना कोणती संस्था किंवा व्यक्तीने अडथळा घालणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

येणाऱ्या काळात भटक्या कुत्र्यांवर कारवाई करताना संस्था व व्यक्ती यांनी हस्तशेप केलेल्या त्यांच्यावर कारवाई करावी असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्याने प्रशासनावर येणारा दबाव कमी होणार असून तरी देखील कोणती संस्था किंवा व्यक्तीने कारवाई दरम्यान अडचणी निर्माण केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.

error: Content is protected !!