महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण:-फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने हा संशयित आरोपी फलटण पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. गोपाळ बदने यांचा शोध फलटण शहर आणि फलटण ग्रामीण पोलीसांकडून करण्यात येत होते.
पोलीस पथकाच्या माध्यमातून पंढरपूर आणि पुणे येथे पाठवण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत गोपाळ बदने पोलीसांना आढळून आला नव्हता. उद्या 26 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फलटण येथे दौरा असून पोलीस प्रशासनावर गोपाळ बदने याला अटक करण्याचे मोठे आव्हान होते.
मात्र, रात्री उशिरा स्वत: गोपाळ बदने फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाला.मृत डॉक्टर महिलेनं तिच्या हातावर लिहिलेल्या नोटवर पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यानं चारवेळा बलात्कार केल्याचं लिहिलं होतं. संपूर्ण महाराष्ट्र सह देशात मोठी खळबळ उडाली होती.कालपासून पोलीस उपनिरीक्षक बदने पोलिसांना गुंगारा देत होता.
या प्रकरणातील दुसरा आरोपी फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी प्रशांत बनकर याला आज दुपारी कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. अतिरिक्त जिल्हा न्यायालय फलटण यांच्याकडून संशयित आरोपी प्रशांत बनकर याला चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानं प्रशांत बनकर याला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फलटण येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात सरकारी वकील महाले यांनी सात दिवसांची पोलीस कस्टडी मागितली होती. तर, आरोपी प्रशांत बनकर यांचे वकील सुनील भोंगळे यांनी संशयित आरोपी प्रशांत बनकर याला कमीत कमी पोलीस कस्टडी द्यावी, असा देखील युक्तिवाद केलेला होता. यावर न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे.सह दिवाणी न्यायाधीश ए. एस. साटोटे यांच्यासमोर संशयित आरोपीचे वकील यांचा युक्तिवाद आणि सरकारी वकील यांचा युक्तिवाद समोरासमोर झाल्यानंतर संशयित आरोपी प्रशांत बनकर याला 28 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.
आरोपी प्रशांत बनकर ला अटक करण्यात आली होती त्याला फलटण येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालय फलटण येथे हजर करण्यात आले होते. पोलिसांकडून किमान सात दिवसाची कोठडी मागितली होती. मात्र, आरोपींच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करून 4 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात यावी अशी मागणी केली होती.28 तारखेपर्यंत प्रशांत बनकर ला पोलीस कस्टडी देण्यात आले आहे.

