महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
क्राईम न्यूज फलटण:-फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला डॉक्टरने हातावर पीएसआय गोपाल बदने याने आपल्यावर चारवेळा बलात्कार केल्याचे व प्रशांत बनकर याने शारिरीक आणि मानसिक अत्याचार केला असल्याचे लिहीत आत्महत्या केली होती.पिडीता राहत असलेल्या घराचा मालक प्रशांत बनकर याला पोलिसांनी पहाटे ४ वाजता अटक केली असून या प्रकरणात फरार झालेला पीएसआय गोपाल बदने हा अद्याप फरारच आहे.
सदर घटनेची माहिती सर्वत्र पसरतात पीएसआय गोपाल बदने याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर निलंबित करण्यात आले आहे. प्रशांत बनकर हा त्याच्या मित्राच्या पुण्यातील एका फार्महाऊसवर लपला होता पोलिसांनी दोन पथके तयार करून या दोघांची शोधमोहिम सुरु केली होती. पहाटेच्या सुमारास प्रशांत बनकर हा एका फार्महाऊसवर लपला असल्याचे पोलिस पथकास समजले तेथून प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केले.
महिला डॉक्टरने फलटण मधील नामांकीत हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. तळहातावर गोपाल बदने याचे नाव लिहून त्याने चारवेळा बलात्कार केल्याचेही त्यात लिहिले होते तसेच प्रशांत बनकर याचे नाव लिहून त्यानेही शारिरीक आणि मानसिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला होता. या आत्महत्येनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सदरच्या घटनेची जोरदार चर्चा सुरू होती. विरोधकांकडून सत्ताधारी यांच्यावर अनेक आरोप होत होते. सदर प्रकरणी पोलीस विभाग , आरोग्य विभाग यांच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यात येत होते.सदर प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने याला अद्याप अटक करण्यास पोलिसांना यश आले नसून तो अद्याप फरार आहे.
तीन ते चार पोलिसांची पथके पीएसआय गोपाल बदने याच्या मागावर असून उद्या दिनांक २६ रोजी फलटणमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असून सदर दौऱ्यापूर्वी पीएसआय गोपाल बदने याला अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

