वेळ अन पैशाची बचत करणारी ड्रोन फवारणी आता खंडाळा, शिरवळ,लोणंद परिसरात उपलब्ध

शिरवळ प्रतिनिधी:- गेल्या काही वर्षापासून ऋतुमानात होत असलेल्या बदलाने पिकाला फवारणी करण्यास विलंब होत आहे. त्यातच पावसाने जरा उघडीप दिली तर फवारणीसाठी मजूर मिळेना. त्यामुळे आता शेतकरी ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने फवारणी करण्याकडे वळत आहे. वेळ अन पैशाची बचत करणारी ड्रोन फवारणी आता खंडाळा, शिरवळ,लोणंद परिसरात उपलब्ध झाली आहे.

ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या माध्यमातून वाठार कॉलनी (भादे) येथे करण जगताप (संपर्क क्रमांक.८६००३४७९०७) यांच्याकडे ऍग्रो नॉमिक्स एग्रीकल्चर ड्रोन सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

श्रीनाथ ड्रोन सर्व्हिस यांच्या माध्यमातून खंडाळा, शिरवळ,लोणंद परिसरातील शेतकऱ्यासाठी ड्रोन फवारणी सुरू करण्यात आली आहे.ड्रोन फवारणी मुळे शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारे आहे, तसेच पिकावरील औषध देखील कमी लागणार असून सर्वात महत्वाचे एक एकरसाठी फक्त १० लिटर पाण्याचा वापर होत आहे त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होत असून शेतकऱ्यांच्या वेळेमध्ये सुद्धा बचत होत आहे.

एक एकर फवारणी फक्त सहा ते सात मिनिटात होते त्यामुळे वेळेची बचत मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.तसेच थोड्याच दिवसात ऊस पिकातील उत्पन्न वाढीसाठी ए.आय सेंटर वाठार कॉलनी येथे लवकरच चालु होणार आहे.पारंपरिक शेती करताना येणाऱ्या अडचणी पाहता, शेतकऱ्यांनी ड्रोनद्वारे फवारणी करत शेतीच्या आधुनिकतेकडे वाटचाल सुरू करण्याची आवश्यकता आहे. खंडाळा, लोणंद शिरवळ भागातील शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी करण जगताप यांनी शेतात फवारणीसाठी ड्रोन खरेदी केले आहे.

लोणंद ,खंडाळा, शिरवळ परिसरातील शेतकरी आता फवारणीसाठी ड्रोन तंत्राचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेळ आणि पैसे दोन्हीची बचत होत आहे.पिकांतील तीन ते साडेतीन फूट वाढलेल्या दाट झाडीमध्ये असुरक्षितता जाणवते. पंपाद्वारे फवारणी करण्यासाठी मनुष्यबळही जास्त लागते.

यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाची पिके जोमात आहेत. शेतकरी खुरपणी आणि फवारणीच्या कामाला लागले आहेत. फवारणीसाठी मजूर लवकर मिळत नाहीत. तसेच त्यासाठी लागणारा खर्चही दोन हजार रुपयांच्या घरात जातो. वेळही जास्त लागतो. त्या तुलनेत ड्रोनद्वारे फवारणी केल्यास खर्च कमी आणि वेळेची बचत होते. त्यामुळे मजूरांना पर्याय म्हणून शेतकरी ड्रोनद्वारे फवारणी करण्याकडे वळत आहे. वेळेची बचत व मनुष्यबळ कमी लागत असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.

श्रीनाथ ड्रोन सर्व्हिस – करण जगताप- संपर्क क्रमांक.८६००३४७९०७ यांना संपर्क साधा

error: Content is protected !!