गॅलेक्सीचा विस्तार वाढला, गॅलेक्सी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या बारामती शाखेचे उद्घाटन

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी:- गॅलेक्सी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने बारामतीकरांच्या सेवेसाठी आपली नवीन शाखा सुरू करून समाजसेवेच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हा उद्घाटन सोहळा प्रमोद दुरगुडे (असिस्टंट रजिस्टर, बारामती) यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी अध्यक्षस्थानी के. बी. ग्रुप ऑफ कंपनिजचे डायरेक्टर आणि गॅलेक्सी ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन, आदरणीय सचिन यादव उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अशांत साबळे, गणेश निकम, हेमंत खलाटे, योगेश यादव, संदीप शिंदे व इतर संचालक, सभासद, ठेवीदार, हितचिंतक, शहरातील नागरिक उपस्थित होते.चेअरमन सचिन यादव यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली व अथक परिश्रमांमुळे “गॅलेक्सी म्हणजे विश्वास” ही ओळख प्रस्थापित झाली.

त्यांच्या प्रेरक मार्गदर्शनामुळे गॅलेक्सी परिवाराने सतत प्रगती साधली आहे, तर सभासद आणि ग्राहकांचा विश्वास, सहकार्य आणि पाठबळ हेच संस्थेचे खरं बळ ठरले आहे.के. बी. एक्सपोर्टच्या माध्यमातून गॅलेक्सी अनेक शेतकऱ्यांशी जोडली गेलेली असून, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सतत कार्यरत आहे. सध्या गॅलेक्सीची सभासद संख्या १०,००० पेक्षा अधिक असून, ५४ कोटी रुपयांच्या ठेवी आणि ४४ कोटी रुपयांच्या कर्जाचे यशस्वी वितरण झाले आहे.

एकत्रित व्यवसायाची रक्कम ९८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. फलटण, राजाळे, साखरवाडी आणि पिंपरी चिंचवड येथे शाखा कार्यरत असून, बारामती येथे नव्या शाखेचे भव्य उद्घाटन झाले आहे. संस्थेने १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना स्थिर रोजगाराची संधी दिली आहे.गॅलेक्सीने सलग चार वर्षे बँको ब्ल्यू रिबिन पुरस्कार पटकावून उत्कृष्ट सेवा सिद्ध केली आहे आणि सतत ‘ऑडिट वर्ग अ’ दर्जा टिकवला आहे.

प्रत्येक शाखेत अत्याधुनिक गोल्ड टेस्टिंग मशीनची सुविधा उपलब्ध असून ५ मिनिटात सोने तारण कर्ज वितरण केले जाते, संस्थेचा एन.पी.ए. १% पेक्षा कमी ठेवून आर्थिक स्थैर्य आणि विश्वास दृढ केला आहे. एकूण कर्जांपैकी ५०% पेक्षा अधिक सुरक्षित सोने तारण कर्ज स्वरूपात दिले गेले आहे, ज्यामुळे सभासदांना त्वरित व विश्वासार्ह आर्थिक मदत मिळते.या उद्घाटनाद्वारे गॅलेक्सीने फक्त शाखा विस्तारली नाही, तर समाज आणि सभासदांच्या विश्वासावर आधारित संस्थेची एक मजबूत ओळख निर्माण केली आहे.

या ५ वर्षात केलेल्या प्रगतीमुळे गॅलेक्सी भविष्यात इतरांसाठी आदर्श ठरेल, अशी खात्री व्यक्त करण्यात आली आहे. गॅलेक्सीचे सर्व उपक्रम नफा कमावण्यापुरते मर्यादित नसून, ते समाजहित आणि प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात आर्थिक स्थैर्य, समाधान आणि प्रगती घडविण्यासाठी उद्देशीत आहेत. या प्रसंगी चेअरमन सचिन यादव यांनी लवकरच गॅलेक्सी मल्टीस्टेट मल्टिपर्पजचे कामकाज बारामतीत सुरू करणार असल्याचे जाहीर केले.

error: Content is protected !!