गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध ; चेअरमन पदी पुन्हा सचिन यादव यांची निवड

l महाराष्ट्र माझा l फलटण प्रतिनिधी l दि. १८ एप्रिल २०२५ l

गॅलेक्सी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड फलटण ता. फलटण जि. सातारा या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक प्रक्रिया अध्यासी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक श्री. जे.पी. गावडे साहेब व श्री. साळुंखे साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. सचिन बबनराव यादव यांची पुन्हा एकदा चेअरमन पदी एकमताने निवड झाली व संस्थेच्या व्हॉइस चेअरमनपदी श्री. योगेश रघुनाथ यादव यांची देखील एकमताने सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी निवड झाली असल्याची माहिती संचालक हेमंत खलाटे यांनी दिली.

संस्थेच्या संचालक पदी श्री. संदीप मोहनराव शिंदे, श्री. गणेश हणमंतराव निकम, श्री. हेमंत बाळासाहेब खलाटे, श्री. अशांत हनुमंत साबळे आणि श्री. संदीप राजू लोंढे यांची सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी निवड झाली. या निवडीबद्दल तसेच सचिन यादव यांची चेअरमन पदी व योगेश यादव यांची व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल के. बी. ग्रुप ऑफ कंपनीचे कर्मचारी व गॅलेक्सी संस्थेचे कर्मचारी यांच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

के.बी. ग्रुप ऑफ कंपनीचे डायरेक्टर आणि एक यशस्वी उद्योजक श्री. सचिन बबनराव यादव यांनी के.बी. उद्योग समूहात कार्यरत असणाऱ्या १५०० कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा सखोल आणि सकारात्मक अभ्यास करून, सर्वसामान्य कर्मचारी यांना जर आर्थिक सहाय्य केल्यास छोट्या मोठ्या व्यवसायातून आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकतात. याचा सखोल अभ्यास करून मागील ५ वर्षापासून सहकार क्षेत्रात गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून सुरुवात केली. सुरुवातीस तालुका कार्यक्षेत्र असणारी संस्था अल्पावधीतच तालुक्यातील दोन संस्थांचे गॅलेक्सी संस्थेत विलीनीकरण करून सातारा जिल्ह्याबरोबरच पुणे जिल्हा कार्यक्षेत्र देखील प्राप्त केले व सदरचे दोन्ही जिल्ह्याचे कार्यक्षेत्र प्राप्त झाल्याने शाखा विस्तार करून आज संस्थेच्या एकूण ६ शाखा अद्यावत व सुसज्ज उभारून कार्यान्वित झाल्या आहेत.

संस्था स्थापनेपासून सभासदांना मुदत ठेवीवर रास्त व्याजदर देऊन चालू आर्थिक वर्षात ७५ कोटींचा एकत्रित व्यवसाय करून एक नवीन उच्चांक प्रस्थापित करून जिल्ह्यातील इतर संस्थांपुढे आदर्श ठेवला आहे. त्याचबरोबर सभासदांना उद्योग व्यवसाय वाढीसाठी कर्ज वितरण करून संस्थेचा एन.पी.ए. २% पेक्षा कमी ठेवण्यात संस्थेने यश मिळवले आहे. तसेच सोने तारणास जास्तीत जास्त कर्ज पुरवठा माफक व्याजदर व मशीनद्वारे सोने ऐवजाची शुद्धता तपासून ग्राहकांना १५ मिनिटात कर्ज अदा करण्यात येत असल्याने सभासद ग्राहकांचा संस्थेस उदंड प्रतिसाद मिळत आहे. संस्थेने स्थापनेपासून सभासद हित जोपासून तसेच तत्पर सेवा प्रदान करून आणि सर्व आर्थिक व्यवहार अतिशय पारदर्शक ठेवून चालू आर्थिक सालात माहे – फेब्रुवारी २०२५ मध्ये पिंपरी चिंचवड या ठिकाणी अद्यावत नवीन शाखा स्थापन केली व त्या नवीन शाखेत कुशल अनुभवी तसेच उच्चशिक्षित कर्मचारी पुणे, मुंबई या महानगरीतून ५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे सर्व सभासद ग्राहक सन्माननीय ठेवीदार व कर्जदार यांना अविरत सेवा सुविधा वेळेत कर्जपुरवठा, ठेवीवर रास्त व्याजदर तसेच सुरक्षितता प्रदान करून आणि एकंदरीतच सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवून सर्व सभासदांचा अतूट विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे माननीय श्री. सचिन यादव सर यांना केंद्रबिंदू मानून व त्यांचे वर अतूट विश्वास ठेवून संस्थेस सभासदांचा खूप प्रतिसाद लाभलेला आहे. ” गॅलेक्सी म्हणजे विश्वास ” हे ब्रीदवाक्य आचरणात आणून सर्व आर्थिक व्यवहार प्रामाणिक व पारदर्शक ठेवले आहेत.

error: Content is protected !!