गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. पतसंस्थेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे उदघाटन संपन्न

फलटण प्रतिनिधी – अल्पावधीतच गरुड भरारी घेतलेल्या गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.फलटण या पतसंस्थेच्या पुणे जिल्यातील पहिल्या पिंपरी-चिंचवड शाखेचे उदघाटन पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.फलटण या पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन व उद्योजक सचिन यादव, संचालिका सौ. सुजाता सचिन यादव आदींसह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी गॅलेक्सी पतसंस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच ही पतसंस्था येणाऱ्या काळात भरभराटीला येऊन तिच्या पुणे जिल्ह्यात जास्तीत जास्त शाखा सुरू होतील अशी अपेक्षाही व्यक्त केली.

संस्थेचे संस्थापक चेअरमन व के. बी. उद्योग समूहाचे संचालक सचिन यादव यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली गॅलेक्सी या पतसंस्थेने आपल्या मजबूत आर्थिक सेवा आणि समुदायाच्या विकासासाठी व सामाजिक बांधिलकीसाठी झपाट्याने नावलौकिक मिळवला आहे. संस्थेच्या स्थापनेपासूनच अतिशय पारदर्शक आणि ग्राहकांना प्रभावी सेवा देऊन संस्थेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. तसेच विविध आकर्षक अशा सुविधा, बचत योजना राबवून सर्वसामान्यांना बचतीची माहिती देऊन सहकारास सामील करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे मोलाचे काम केले आहे आणि सभासद, ग्राहक व हितचिंतक यांच्या अडचणींचे काळात अर्थिक सहाय्य देऊन ग्राहकांच्या मनात संस्थेबद्दल एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. असेच अविरहित सेवा देऊन भविष्यात संस्थेचे व ग्राहकांची जीवनमान उंचावण्याचे सचिन यादव यांनी यावेळी बोलून दाखवले. गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह संस्थेस नुकतेच मिळालेला “अ-वर्ग” सन्मान म्हणजे संस्थेच्या प्रामाणिकपणाची आणि पारदर्शक कारभाराच पोहच पावती आहे.

सुरुवातीच्या काळात फक्त सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या गॅलेक्सी संस्थेने पुणे जिल्ह्यात आपल्या कामकाजाचा विस्तार करण्याची अधिकृत परवानगी मिळवून पिंपरी चिंचवड येथे पुणे जिल्ह्यातील पहिली शाखा सुरू करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. 2019 मध्ये स्थापनेपासून सातारा जिल्ह्यातील जनतेची यशस्वीपणे सेवा करणाऱ्या या अग्रगण्य सहकारी संस्थेसाठी हा विस्तार एक मोठे पाऊल आहे.आपल्या गतिमान दृष्टीकोन आणि नाविन्यपूर्ण धोरणांसाठी ओळखले जाणारे सचिन यादव यांनी सहकाराच्या सेवा पुणे जिल्ह्यातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा दृष्टीकोन व्यक्त केला आहे, ज्याचा उद्देश दर्जेदार आर्थिक उपायांची वाढती मागणी पूर्ण करणे हा आहे. सोसायटीच्या विस्तारामुळे पुण्यातील रहिवाशांसाठी, विशेषतः बचत, कर्जे आणि इतर आर्थिक सेवांच्या क्षेत्रात नवीन संधी मिळतील अशी अपेक्षा आहे.गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि संस्थेने सातारा जिल्ह्यात विश्वासाचा एक भक्कम पाया तयार केला असून, आपल्या सदस्यांना यशस्वीरित्या आर्थिक सेवा प्रदान केल्या आहेत. या विस्तारासह, या सहकारी संस्थेचे उद्दिष्ट पुण्यात आपल्या यशाची पुनरावृत्ती करण्याचे आहे. सातारा जिल्ह्यातील गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची यशस्वी घोडदौड पुणे जिल्ह्यात सुद्धा अशीच चालू राहील असा विश्वास संस्थेचे कर्मचारी, ग्राहका आणि सभासदांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!