ढेबेवाडी बाजारतळ येथील श्री गणेश मंडळ गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन

ढेबेवाडी प्रतिनिधी – ढेबेवाडी ता. पाटण येथे शनिवारी श्री गणेश मंडळ बाजारतळ येथील दगडू शेठ गणपतीचे विसर्जन भक्तिमय वातावरणात झाले.

डॉल्बीला फाटा देत अध्यात्मिक व सात्वीक वातावरणात पारंपारिक वाद्य ढोल ताशाच्या गजरात तसेच गेले पंधरा वर्षापासून गुलाल विरहीत काढण्यात आलेल्या ढेबेवाडी येथील श्री गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीने पंचक्रोशीच्या गणेश मंडळांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

भक्तीमार्गाऐवजी अवघ्या काही तासांच्या धांगडधिंग्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा करणाऱ्या मंडळांच्या अगदी विपरीत विसर्जन मिरवणूक ढेबेवाडी बाजारतळ येथील श्री गणेश मंडळाने काढली. या मिरवणुकीत महिलांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग घेतला.गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार असा जयघोष करत सायंकाळी सहा वाजता गणेश भक्तांनी गणरायाला विसर्जन करून निरोप दिला.

पर्यावरणपूरक विसर्जनासाठी ढेबेवाडी ग्रामपंचायत कडून नदीपात्रात प्रदूषण होऊ नये म्हणून नदी परिसरात गणेश मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्रची व्यवस्था करण्यात आली होती. ढेबेवाडी ग्रामपंचायतकडून जुन्या पुलावरील अडगळीचा रस्ता गणपती विसर्जनासाठी जे.सी. पी च्या साह्याने चकाचक करण्यात आल्याने गणेश भक्तांनी समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!