“डायल ११२” वरती प्राप्त तक्रारीवरून ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीकडे धारदार लोखंडी सत्तूर आढळून आल्या प्रकरणी गुन्हा दाखल

फलटण प्रतिनिधी:- पेट्रोलिंग करीत असताना डायल ११२ वरती प्राप्त तक्रारीवरून ताब्यात घेण्यात आलेल्या दारू पिलेल्या व्यक्तीकडे धारदार लोखंडी सत्तूर आढळून आल्या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिंनाक १५ रोजी रात्री ७:४२ वाजण्याच्या सुमारास पो.हवा अमोल रामदास जगदाळे,पोलीस उपनिरीक्षक जी. बी. बदने, पो.हवा नितिन चतुरे, हे विडणी याठिकाणी पेट्रोलिंग करीत असताना अमोल श्रीरंग जगताप (रा. विडणी ता. फलटण) याने प्रशांत पोपट रणदिवे (रा. राजुरी ता. फलटण) हा त्याच्या ताब्यातील बलेनो कार नंबर एमएच-११-डीएच ४०२८ मध्ये बसून त्याचेकडे सत्तूर सारखे हत्यार घेवून मला मारण्यासाठी आला होता. प्रशांत रणदिवे हा हत्यार व गाडीसह राजुरीकडे निघून गेला. त्यावेळी मी डायल ११२ ला कॉल केला होता असे पोलीस कर्मचारी यांना सांगितले.

त्यानंतर पोलीस कर्मचारी तेथून राजुरी बाजूकडे पेट्रोलिंग करत सदर गाडीचा शोध घेत जात असताना ८:०५ वाजण्याच्या सुमारास राजुरी गावच्या ह‌द्दीत हॉटेल आर्यन समोर बलेनो कार नंबर एमएच-११-डीएच-४०२८ दिसून आली. त्यावेळी त्या गाडीमध्ये असलेल्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्याने पोलीस कर्मचारी त्यांचेकडे जात असताना त्याने पोलीस कर्मचारी यांना पाहिल्यावर तो व्यक्ती तेथून पळून जाताना त्यास पकडल्यावर त्याचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव प्रशांत पोपट रणदिवे (वय ३० वर्षे, रा. राजुरी, ता. फलटण, जि. सातारा) असे सांगितले. त्यावेळी त्याचा तोंडाचा दारुचा उग्र वास येत होता.

पंचासमक्ष प्रशांत रणदिवे याची अंगझडती घेतली असता शर्टच्या पाठीमागील बाजूस एक धारदार लोखंडी सत्तूर आढळून आला.प्रशांत पोपट रणदिवे याची पोलीस स्टेशन येथे ब्रोथ अॅनालायझर मशीन मध्ये तपासणी केली असता रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. याप्रकरणी प्रशांत पोपट रणदिवे (वय 30 वर्षे, रा. राजुरी, ता. फलटण, जि. सातारा) याच्या विरोधात पो.हवा अमोल रामदास जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!