साखरवाडी येथे ताडीची चोरटी विक्री प्रकरणी एक जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

फलटण प्रतिनिधी:- मौजे साखरवाडी येथे घराचे आडोश्याला बेकायदा, बिगरपरवाना ताडीची चोरटी विक्री करत असल्या प्रकरणी एक जणांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १८ रोजी मौजे साखरवाडी, ता. फलटण गावचे ह‌द्दीत वर्धमान मंगल कार्यालयाजवळ एका घराच्या आडोशाला उघड्यावर विजय अशोक लंभाते (रा. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) हा ताडीची बेकायदा, बिगरपरवाना चोरटी विक्री करीत आहे अशी माहिती पोलीस कर्मचारी यांना मिळाली असता ग्रामीण पोलीस कर्मचारी यांनी अचानकपणे ५:४५ वाजण्याच्या सुमारास मौजे साखरवाडी, ता. फलटण गावचे ह‌द्दीत वर्धमान मंगल कार्यालयाजवळ छापा टाकला असता तेथे एक व्यक्ती एक पांढरे रंगाचे कॅन घेवून बसलेला दिसला. त्यास पोलीसांची चाहूल लागताच तो त्याच्याकडील समोरील कॅन जागीच सोडून पळून जावू लागला.

पळून जात असताना त्यास पकडले असता त्यानंतर त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव विजय अशोक लंभाते (वय ४२ वर्षे, रा. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे सांगितले व पोलीस कर्मचारी यांनी त्याने सोडून दिले कॅन मध्ये काय आहे हे पाहिले असता आंबट वासाची ताडी मिळून आली. त्यास ताडी विक्री करण्याचा परवाना आहे का? असे विचारल्यावर त्याने परवाना नसल्याचे सांगितले. पो.हवा अमोल रामदास जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय अशोक लंभाते याच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!