ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- ढेबेवाडी ग्रामपंचायत माध्यमातून १५ व्या वित्त आयोगातून विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.

या कामामध्ये 1) गणपती मंदिर ते विद्यालयापर्यंतचे रस्त्याचे काँक्रिटीकरण.2) सुलाबाई कारंडे,घर ते मुस्लिम समाज प्लॉटपर्यंत गटार बांधणे.3) स्वच्छ भारत अभियानांतर्गत ढेबेवाडी बाजारतळ या ठिकाणी शौचालय बांधणे या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी विलास गोडांबे कृषी उत्पन्न बाजार समिती पाटणचे उपसभापती, सौ रूपालीताई पाटील ढेबेवाडी सरपंच, अभिजीत कडव ढेबेवाडी उपसरपंच, माजी सरपंच संजय पाटील, ढेबेवाडी ग्रा. प.स. सोमनाथ पाटील, अश्विनी मोहिते, यास्मिन डांगे, गणेश कारंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य नवाज डांगे, अण्णा कारंडे अध्यक्ष अ. जा. ज. मोर्चा, शेखर लोखंडे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा, सचिन फल्ले ओबीसी मोर्चा सरचिटणीस , आत्माराम कदम माजी सरपंच ढेबेवाडी जमीर डांगे,सतीश पल्ले, कुमार कचरे, मुरलीधर कचरे,शांताराम पाटील (पाणीपुरवठा अध्यक्ष मंद्रुळ कोळे ) आदी मान्यवर उपस्थित होते.


