‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत तिरंगा रॅली व तिरंगा प्रतिज्ञा चे आज फलटण मध्ये आयोजन

फलटण प्रतिनिधी: दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वाजता ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत तिरंगा रॅली व तिरंगा प्रतिज्ञा चे आज फलटण मध्ये आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिली आहे.

मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासन निर्देशानुसार आपल्या फलटण शहरामध्ये ‘हर घर तिरंगा 2025’ उपक्रमांतर्गत फलटण नगर परिषद , तहसील कार्यालय, पंचायत समिती व फलटण मधील सर्व शासकीय कार्यालय यांच्यातर्फे फलटण शहरातील नगरपरिषद व शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, उपशिक्षक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी यांची दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वाजता तिरंगा रॅली व तिरंगा प्रतिज्ञा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

तिरंगा रॅली चा मार्ग तहसील कार्यालय–महात्मा फुले चौक-गजानन चौक- उमाजी नाईक चौक – महावीर चौक-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक असा आहे.तरी शहरातील सर्व नागरीक,पत्रकार,ज्येष्ठ नागरीक, स्वातंत्र्यसैनिक या सर्वांनी दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वाजता तहसील कार्यालय फलटण येथे उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले आहे.

error: Content is protected !!