ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- ढेबेवाडी बाजारपेठेतील रस्त्यांची खड्ड्यामुळे अक्षरश चाळण झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने खड्ड्यात पाणी साचून तळ्याचे स्वरूप निर्माण झाले होते याबाबत “महाराष्ट्र माझा” बातमी प्रसिद्ध होताच ग्रामपंचायत कडून खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून खड्डे मुजवण्यात आले.
मागील आठवड्यात मंगळवार रोजी ढेबेवाडीचा बाजार असल्याने व्यापारी व ग्राहकांना येजा करताना मोठी कसरत करावी लागत होती. ढेबेवाडी गावचा आज बाजार असल्याने या रस्त्यावर व्यापारी, ग्राहक,नागरिक यांची खूप वर्दळ असते. रस्त्याच्या दु- तर्फे बाजार असल्याने. विशेष बाजारासाठी आलेल्या महिला वर्गाला या खड्ड्यातून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत होती. “महाराष्ट्र माझा”ने याबाबत आवाज उठवल्यानंतर ढेबेवाडी ग्रामपंचायत कडून खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून खड्डे मुजवण्यात आल्याने येथील व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.