महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला असून राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी या निवडणुकांची अधिकृत घोषणा केली. या घोषणेनुसार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. ग्रामीण भागाच्या सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांकडे नागरिकांचेही लक्ष लागले आहे.
निवडणूक वेळापत्रक
नामनिर्देशन पत्र स्वीकारणे: १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६
नामनिर्देशन पत्रांची छाननी: २२ जानेवारी २०२६
उमेदवारी माघार घेण्याची अंतिम मुदत: २७ जानेवारी २०२६
अंतिम उमेदवार यादी जाहीर व निवडणूक चिन्ह वाटप:२७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी साडेतीन नंतर
मतदान: ५ फेब्रुवारी २०२६
मतमोजणी: ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.या निवडणुकांमुळे राज्यातील ग्रामीण राजकारणात मोठी चुरस पाहायला मिळणार असून प्रचार, उमेदवारांच्या घोषणा आणि राजकीय हालचालींना येत्या काही दिवसांत वेग येणार आहे.

