उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

सातारा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज कराड येथील प्रितीसंगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी भेट देऊन पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह विविध सामाजिक व शासकीय संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी प्रथमच कराड येथे येत स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले.यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते उपस्थितांना आठवले. स्व. अजित पवार हे वारंवार कराड येथे येऊन प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन करत असत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

error: Content is protected !!