संविधान निर्मितीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणसाशी जोडले – अनिरुद्ध गाढवे

खंडाळा :- ६ डिसेंबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खंडाळा शहर भाजप यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली देण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी खंडाळा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध (संजीव) शंकरराव गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मनोगत व्यक्त करताना अनिरुद्ध गाढवे म्हणाले-“भारत देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक महापुरुष व वीरांगणा यांनी हौतात्म्य स्वीकारले स्वतंत्र भारताला एकसंघ ठेवण्यासाठी स्वराज्य, सुराज्य यासोबत लिखित नियम ग्रंथाची गरज होती यासाठी डॉ. आंबेडकर यांनी संविधान निर्मिती करून माणसाला माणसाशी जोडण्याच मोठं काम केले असे महापुरुष पुन्हा होणे नाही…”यावेळी बापूराव धायगुडे,अतुल बाबा पवार, संदीप जाधव,साजिद मुल्ला,चंद्रकांत पवार, फिरोज पटवेकरी,प्रकाश काका गाढवे,हणमंत यादव,संजय आवटे, बाळासाहेब भोसले, धनंजय गायकवाड आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!