कंपनीच्या कामाचा ठेका घेण्यावरून केसूर्डीत राडा

खंडाळा – केसूर्डी येथे कंपनीच्या कामाचा ठेका घेण्यावरून झालेल्या वादातून लोखंडी हत्याराने मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन्ही गटातील माजी सरपंच आणि माजी ग्रामपंचायत सदस्यांसह तब्बल २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून केसुर्डी येथे एका कंपनीचे कामे चालू आहे. दरम्यान, केसुर्डी येथील कंत्राटदार प्रशांत रमेश ढमाळ यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादनुसार शुक्रवार दि.१० जानेवारी रोजी कंपनीच्या जागेवर कंपनीच्या कामावरून केसूर्डीचे माजी ग्रामपंचायत सदस्य संजय तुकाराम ढमाळ, तेजस संजय ढमाळ हे दोघे हातामध्ये लोखंडी हत्यार घेऊन तसेच केसुर्डी येथील गौरव राजेन्द्र ढमाळ m, प्रतीक नितीन ढमाळ, साहिल शामराव शेडगे, रियाज रफिक शेख, कर्णवडी येथील तेजस कृष्णा जाधव, घाटदरे येथील आदित्य शुभम कदम हे हातात लोखंडी रॉड घेऊन कंपनीच्या जागेवर असणारे अनिकेत भंडारे यांच्याशी वाद घालून मारहाण करू लागले. यावेळी दशरथ जाधव, विनय जाधव यांनाही जमावाने आलेल्या लोकांनी हत्याराने केलेल्या मारहाणीत प्रशांत ढमाळ यांच्या अंगावर धावत जाऊन संजय ढमाळ याने कोयत्याने उजव्या कानावर मारून जखमी केले.

याप्रकरणी प्रशांत ढमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय ढमाळ,तेजस ढमाळ,गौरव ढमाळ,प्रतीक ढमाळ,साहिल शेडगे,रियाज शेख, तेजस जाधव, आदित्य कदम हा आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.तेजस संजय ढमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवार दि.१० जानेवारी रोजी केसूर्डी गावच्या हद्दीमध्ये काम करत असताना त्याठिकाणी प्रशांत रमेश ढमाळ, भूषण संदीप ढमाळ, केसूर्डी चे माजी सरपंच गणेश रमेश ढमाळ याने विनय विजय जाधव, विशाल विजय जाधव, सौरभ चंद्रकांत शिवतरे, प्रतिक दत्तात्रय पवार, बाळू अशोक ढमाळ, विजय नामदेव जाधव, दशरथ राजेंद्र जाधव, निरंजन राजेंद्र जाधव, आनंदा यदु ढमाळ, हरिभाऊ ढमाळ सर्व रा.केसुर्डी व इतर अनोळखी व्यक्ती हे जमावणे शिवीगाळ, दमदाटी करीत तुम्ही कंपनीचे कामकाज करायचे नाही, काम आम्हीच करणार असे म्हणून गौरव ढमाळ,साहिल शेडगे यांनाही हाताने काठीने व दगडाने मारहाण करून गौरव ढमाळ याला जखमी केले.

तेजस धमाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश ढमाळ, प्रशांत ढमाळ, भूषण ढमाळ, विनय जाधव, विशाल जाधव, सौरभ शिवथरे, प्रतीक पवार, बाळू ढमाळ, विजय जाधव, दशरथ जाधव, निरंजन जाधव, आनंदा ढमाळ, सचिन ढमाळ व इतर अनोळखी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सपकाळ करीत आहेत.

कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून तक्रार अर्ज दाखल

केसुर्डी येथे कंपनीचा कामावरून झालेल्या मराणीमध्ये परस्पर विरोधी तक्रार दाखल होऊन दोन्ही गटातील तब्बल 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनी प्रशासनाकडून याबाबत शिरवळ पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून शिरवळ पोलीस यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

error: Content is protected !!