फलटण:- खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदुतांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प कार्यक्रमांतर्गत कृषीविषयक ॲप्लिकेशन्स माहिती यांच्या संबंधी प्रात्यक्षिक कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमा वेळी कृषिदुत इंगोले धनंजय, केसकर राहुल, कांबळे रोहन, धुमाळ श्रीजीत, काटकर सौरभ, रनवरे शिवतेज ,गोडसे आदित्य यांनी मोबाइलमधील शेतीविषयक विविध अप्लिकेशन्स जसे की ई-पीक पाहणी,Agri ॲप ,पीक विमा ॲप, ग्रेप मास्टर, इ. ची ओळख शेतकऱ्यांना मोबाइलद्वारे करून दिली.या अप्लिकेशन्सद्वारे पीक उत्पादन तंत्रज्ञान माहिती मिळविण्यासाठी ज्ञान आणि वापर करून हवामान अंदाज, पूरक बियाणे, कीटकनाशके व खते यांच्या चालू बाजारभाव याचे मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्याला शेतीचे अर्थनियोजन योग्य पद्धतीने करण्यासाठी कसे मदत करतात, याविषयी माहिती दिली. कृषीदुतांनी हे अप्लिकेशन्स मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यापासून ते त्याचा प्रत्यक्ष उपयोग कसा करावा याची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली.
