अहिरे ता.पारगाव खंडाळा येथे कृषी दूतांचे आगमन

फलटण प्रतिनिधी:- फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथील सातव्या सत्रातील उद्यानदुत प्रशिक्षणासाठी अहिरे ता. पारगांव खंडाळा जि.सातारा येथे दाखल झाले असुन अहिरे ग्रामपंचायत येथे सरपंच, उपसरपंच, कृषि सहायक, तलाठी व ग्रामस्थांनी या उद्यानदुत विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

ग्रामीण उद्यानविदया कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सुमारे २२ आठवडे येथे वास्तव्यास राहणार असलेले हे विद्यार्थी शेतकऱ्यांना शेतिविषयक माहिती, नवीन तंत्रज्ञान याबाबत माहिती देऊन गावामध्ये शेतिविषयक विविध उपक्रम व कार्यक्रम राबविणार आहेत. माती परीक्षण, फळबाग लागवड, एकात्मिक कीड रोग, बीज प्रक्रिया, आधुनिक शेती औजारांचे वापर, शेतीचा आर्थिक फायदा, जनावरांचे लसीकरण आदीबाबत उपस्थित गावकरी व शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे या उद्यानदुतां नी सांगितले.

उद्यानविद्या विषयक जनजागृती करण्यास उद्यानविदया कार्यानुभव यांचा अभ्यास उद्यानदुत करणार आहेत. दंडे रोहन, दारफळे प्रज्वल, आल्हाट सुमित, जैन श्रेयांश,शेंडगे शिवम हे उद्यानदूत येथे दाखल झाले आहेत. त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सरपंच रवींद्र सोनवणे, कृषि सहायक खरात मॅडम, ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ यांनी यावेळी दिले. उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यु.डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.जे.व्ही. लेंभे व प्रा.ए.डी. पाटील यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभणार आहे.

error: Content is protected !!