मांडकी येथे एआय टेक्नॉलॉजी आणि ड्रोन फवारणी मार्गदर्शन शिबिर संपन्न

पुरंदर प्रतिनिधी :- कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या वतीने ड्रोन विभाग प्रमुख शेख,होले,इंडिया ऍग्रो चे पवार,नाळे यांनी मांडकी येथे ऊस शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी “AI TECHNOLOGY” विषयी आणि त्यासंलग्न “ड्रोन फवारणी” आणि “इंडिया ऍग्रोच्या सेंद्रिय प्रॉडक्ट” विषयी लाखमोलाचे मार्गदर्शन केले.

या नवीन उपक्रमामुळे शेतकऱ्यांची फार मोठी आर्थिक आणि वेळेची बचत होणार असून पर्यावरण पूरक शेतीकडे शेतकरी वळताना अलीकडच्या काळात दिसून येत असल्याचे यावेळेस शेख यांनी सांगितले.तसेच लवकरच येत्या काही दिवसात मांडकी येथे “कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि सोमेश्वर कारखान्याच्या” वतीने “AI TECHNOLOGY च्या रजिस्ट्रेशन” विषयी मीटिंग होणार असल्याचे सांगितले.

तसेच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मानसिंग तात्या जगताप, मा.सरपंच सतीश नाना जगताप, पोलीस पाटील श्रीतेज जगताप यांनी प्रास्ताविक मांडून आभार व्यक्त केले.यावेळी “श्रीनाथ ड्रोन सर्व्हिस” चे करण जगताप आणि मांडकी गावातील प्रगतशील शेतकरी बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!