फलटण प्रतिनिधी:- संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या प्रश्नावर आंदोलने करणारे प्रा. लक्ष्मण हाके यांनी नुकतीच मिरगाव ता. फलटण येथे शिवसेना शिंदे गटाचे कळंबोली शहर प्रमुख तुकाराम शेठ सरक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी तुकाराम शेठ सरक सरक यांनी प्रा. लक्ष्मण हाके यांचा चळवळीत देत असलेल्या योगदानाबद्दल सत्कार केला.

ओबीसी आरक्षण आणि पुढील आंदोलनाची रूपरेषा या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सरक यांनी प्रा. लक्ष्मण हाके यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. भेटी प्रसंगी शिवसेना कळंबोली शहरप्रमुख तुकारामशेठ सरक, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल पडर सर, युवा नेते पिंटूशेठ खताळ, नितीन गोफणे सर उपस्थित होते.

